मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: रेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी

Gold Price Today: रेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढउतार सुरू आहे. आज सोन्यासह चांदीचे दरही कमी झाले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 7,817 रुपयांनी कमी आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जुलै: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेल्या काही दिवसांपासून चढउतार जारी आहे. आज पुन्हा एकदा सोन्यासह चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 7,817 रुपयांनी कमी आहेत. एमसीएक्स (MCX) वर सोन्याची वायदे किंमत 0.03 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,383 रुपये प्रति तोळा झाले आहेत. चांदीच्या दरातही आज 0.33 टक्के घसरण झाली आहे, जाणून घ्या काय आहेत आजचे मौल्यवान धातूंचे दर.

सोन्याचांदीचे दर (Gold-Silver Price Today)

एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे दर 0.03 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर 48,383 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर सोन्यासह चांदीचे दर 0.33 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर 67,976 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

रेकॉर्ड स्तरापेक्षा स्वस्त आहे सोनं

मागील वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. तर आज MCX नुसार, सोनं 48,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील वर्षीच्या उच्चांकी पातळीवरुन सोने दर अद्याप 7,817 रुपये स्वस्त आहे.

हे वाचा-खूशखबर! PNB या ग्राहकांना देत आहे 1 ते 25 लाख रुपये,तुम्हाला असा मिळू शकतो फायदा

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

हे वाचा-सोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे? आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर

सोनं शुद्ध आहे हे कसं ओळखाल?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today