नवी दिल्ली, 5 जुलै: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या दरात
(Gold price today) काहीशी घसरण पाहायला मिळाली. कमकुवत ग्लोबल मार्केटदरम्यान भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. तर चांदी
(Silver Price) आज 70 हजारांच्यावर ट्रेड करत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर
(MCX) सोनं 47309 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेवलवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा दर 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 70425 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. सोनं सध्या आपल्या ऑल टाईम हाय रेकॉर्डपासून जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त आहे.
सोन्याच्या दरांनी ऑगस्ट 2020 मध्ये ऑल टाईम हाय रेकॉर्ड केला होता. त्यावेळी सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं. त्यानंतर रेकॉर्ड स्तरापासून सोन्याचे दर अद्यापही 9 हजारांनी खाली आहेत. सध्या ग्लोबल मार्केटमध्येही सोने दरात घसरण झाली आहे.
5 जुलै 2021 रोजी इंडियन मार्केटमधील गोल्ड रेट -
24 कॅरेट गोल्ड - 56,558 रुपये 10 ग्रॅमसाठी
22 कॅरेट सोन्याचा भाव - 51,845 रुपये एक तोळा
20 कॅरेटचा दर - 47,132 रुपये तोळा
18 कॅरेट सोनं - 42,418 रुपये 10 ग्रॅम
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर मागील रेकॉर्ड तोडत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज आहे. परंतु या मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशात गुंतवणुकदार 6 महिन्यांच्या काळात आणि स्टॉपलॉससह नफा कमावू शकतात. मागील वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिले आहेत. जर लाँग टर्मसाठी अर्थात दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर सोनं अजूनही गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.