Home /News /money /

Gold Price Today: वधारला सोन्याचा भाव तर चांदी घसरली, वाचा 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Gold Price Today: वधारला सोन्याचा भाव तर चांदी घसरली, वाचा 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वधारले आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. शिवाय भारतात सोन्या-चांदीची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आज सोन्याच्या दरात (Gold Rate Today) किरकोळ वाढ झाली आहे.

    मुंबई, 05 जानेवारी: लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वधारले आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. शिवाय भारतात सोन्या-चांदीची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आज सोन्याच्या दरात (Gold Rate Today) किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदी स्वस्त (Silver Rate Today) झाली आहे. आज, बुधवारी 5 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याच्या फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या किमतीत 0.10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर चांदीच्या दरात 0.14 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today) आजच्या व्यवहारात, फेब्रुवारीच्या फ्युचर्स सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांनी वाढून 47,995 रुपये प्रति तोळा झाली आहे. कालही सोन्याच्या दरात वाढ झाली होती. चांदीची किंमत आज (Silver Price Today) दुसरीकडे, चांदीच्या किंमतीत 0.14 टक्क्यांनी घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 62,141 रुपये प्रति किलो आहे. हे वाचा-मार्च 2022 पूर्वी पूर्ण करा ही 7 कामं, डेडलाइन मिस झाल्यास होईल मोठं नुकसान कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. हे वाचा-झुनझुनवालांचे हे टॉप 5 शेअर्स तुमच्याकडे आहेत? मिळालाय कोट्यवधीचा रिटर्न महाराष्ट्रात सोन्याच्या दरात किरकोळ बदल (Gold Rate in Maharashtra) पाहायला मिळतो आहे. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या चार शहरातील सोन्या-चांदीचे दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई49250 रुपये49260 रुपये
    पुणे48620 रुपये48630 रुपये
    नाशिक48620 रुपये48630 रुपये
    नागपूर49250 रुपये49260 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई47250 रुपये47260 रुपये
    पुणे46110 रुपये46120 रुपये
    नाशिक46110 रुपये46120 रुपये
    नागपूर47250 रुपये47260 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई62300 रुपये61700 रुपये
    पुणे62300 रुपये61700 रुपये
    नाशिक62300 रुपये61700 रुपये
    नागपूर62300 रुपये61700 रुपये
    घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver

    पुढील बातम्या