मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण सुरूच, पुन्हा दर 47 हजारांपेक्षा कमी

Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण सुरूच, पुन्हा दर 47 हजारांपेक्षा कमी

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात 6 ऑगस्ट रोजी सोन्याचांदीचे दर उतरले आहेत.

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय बाजारात दर उतरल्यामुळे आज 6 ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर (Gold Price Today) उतरले आहेत. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा 47 हजारांपेक्षा कमी आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील आज कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,853 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 66,175 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.

सोन्याचांदीचे नवे दर (Gold and Silver Price Today on 06th August 2021)

दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 283 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे भाव 46,570 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर 66,175 रुपये प्रति किलो होते, त्यात 661 रुपयांची घसरण होऊन दर 65,514 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Rates in International Market) 1,799 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत. तर याठिकाणी चांदीचे दर 25.15 डॉलर प्रति औंसवर आहेत.

हे वाचा-ही सरकारी बँक देतेय कर्जावर विशेष सवलत, 30 सप्टेंबपर्यंत ही सेवा फ्री!

तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. शिवाय यावर्षी सोन्याचे दर 60000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशावेळी सध्या कमी दर असताना सोनेखरेदी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात किंमती वाढल्यानंतर गुंतवणूकदारांना फायदा होईल.

90,000 रुपये स्तरावर पोहचू शकतात सोन्याचे दर

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्यामध्ये चढउतार जारी आहे. व्हॅक्सिनेशन प्रक्रिया जगभरात सुरू झाल्यानंतर अशाप्रकार चढउतार अधिक प्रमाणात होत आहे. अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं असं म्हणणं आहे की सोन्याचे दर पुढील 3-5 वर्षात सध्यापेक्षा दुप्पट होतील. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 3000-5000 डॉलर प्रति औंसवर पोहचू शकतात. या अंदाजाने भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

First published:
top videos