Gold Price Today: सोने-चांदी दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोने-चांदी दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 69,513 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets)आज गोल्ड रेट घसरला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : भारतीय बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी 17 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 717 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 1274 रुपये प्रति किलोग्रॅमची मोठी घसरण झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 69,513 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets)आज गोल्ड रेट घसरला आहे.

सोन्याच्या नव्या किंमती (Gold Price, 17 February 2021) -

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 717 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका कमी झाला आहे. दिल्लीत 99.99 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 46,102 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. या आधीच्या सत्रात हाच भाव 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरून 1786 डॉलर प्रति औस इतका आहे.

(वाचा - New Labour Code : नव्या कामगार कायद्यांचा तुमच्या पगारावर काय परिणाम होणार?)

चांदीचा नवा दर (Silver Price, 17 February 2021) -

चांदीच्या दरातही बुधवारी मोठी घसरण झाली. दिल्लीत चांदीचा भाव 1274 रुपयांनी घसरून 68239 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात आज गोल्ड रेट मोठ्या दराने घसरला. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळाला. तसंच रुपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यानेही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

(वाचा - या महिन्यात तुमच्या LPG गॅसवर किती मिळेल सबसिडी? अशाप्रकारे घरबसल्या तपासा)

दरम्यान, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात (import Duty) कपात करण्याची घोषणा केली गेली आहे. अर्थसंकल्पात घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात केली. सध्या या दोन्हींवर साडेबारा टक्के आयात शुल्क द्यावं लागतं. परंतु आता या घोषणेनंतर केवळ साडेसात टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 17, 2021, 5:59 PM IST

ताज्या बातम्या