जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold prices today: आतापर्यंत 12000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold prices today: आतापर्यंत 12000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold prices today: आतापर्यंत 12000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत जवळपास 12000 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तर चांदी 11000 रुपये स्वस्त झाली आहे. केवळ या वर्षात 2021 मध्ये सोन्याचा भाव जवळपास 6 हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 मार्च : सोने-चांदी (Gold-Silver) दरात आज तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity Exchange) सोन्याचा भाव (Gold Price Today) आज 0.4 टक्के वाढीसह 44,915 रुपयांवर आहे. तर चांदीचा दर (Silver Price Today) 0.6 टक्के वाढून 67,273 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत जवळपास 12000 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तर चांदी 11000 रुपये स्वस्त झाली आहे. केवळ या वर्षात 2021 मध्ये सोन्याचा भाव जवळपास 6 हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे. 24 कॅरेट गोल्ड रेट - आठवड्याच्या सुरुवातील सोमवारी राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,180 रुपये आहे. चेन्नई 46,170 रुपये मुंबई 44,880 रुपये कोलकाता 46,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

(वाचा -  18 रुपयांचा शेअर 4 महिन्यांत 1300 रुपये ,10 हजारच्या गुंतवणुकीवर लाखोंचा रिटर्न )

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 0.14 डॉलरच्या तेजीसह 1,727.22 डॉलर प्रति औस इतका रेट आहे. तर चांदी 0.09 डॉलर वाढीसह 26.02 डॉलर इतकी आहे. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी 12 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव 291 रुपयांच्या घसरणीसह 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव शुक्रवारी 1096 रुपये कमी होऊन 65,958 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

(वाचा -  Explained: 15,16 मार्च रोजी बॅंकांचा देशव्यापी संप; चार दिवस बँका राहणार बंद )

भारतात येत्या काळात लग्नसमारंभामुळे सोन्या-चांदीची मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसंच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या वर्षात सोने दर 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात