मराठी बातम्या /बातम्या /मनी /Explained: 15,16 मार्च रोजी बॅंकांचा देशव्यापी संप; काय आहेत नेमकी कारणं?

Explained: 15,16 मार्च रोजी बॅंकांचा देशव्यापी संप; काय आहेत नेमकी कारणं?

Nationwide strike of banks - चार दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Nationwide strike of banks - चार दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Nationwide strike of banks - चार दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 13 मार्च : सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या (Public Sector Bank’s Privatization) धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास दहा लाख कर्मचारी असलेल्या सरकारी बँका (PSU Banks) आणि काही जुन्या खासगी बँकांनी (Old Private Banks) येत्या 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारला आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...

    बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची कारणे :

    दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सरकारच्या 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीच्या मोहिमेचा (Disinvestment Drive) भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. वर्ष 2021-22मध्ये आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपनीचं खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील नऊ बँक कर्मचारी संघटनांची महासंघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं (UFBU) 15 आणि 16 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

    बँकिंग सेवेवर काय परिणाम होईल ? :

    15 आणि 16 मार्च रोजीच्या संपापूर्वी 13 मार्चला दुसरा शनिवार आणि 14 मार्च रोजी रविवार म्हणून बँका बंदच असणार आहेत. त्यामुळं चार दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात या चार दिवसात एटीएम सेवा सुरू राहील; मात्र चेक क्लिअरन्स, नवीन खाती उघडणे, डिमांड ड्राफ्ट जारी करणे आणि कर्ज प्रक्रिया या सेवांवर 17 मार्चपर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) संप काळात कामकाज सुरळीत सुरू राहावं यासाठी सर्व शाखा आणि कार्यालयांमध्ये पर्यायी व्यवस्था केली असल्याचं म्हटलं आहे. संपाचा परिणाम कामकाजावर होऊ शकतो असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.

    हे वाचा-15 मार्चला आहे मोठी कमाई करण्याची संधी! इतके पैसे गुंतवणून मिळवा मोठा फायदा

    खासगी बँक कर्मचारीही संपावर आहेत काय?

    एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक या आधुनिक काळातील खासगी बँका या संपात सहभागी नसल्यानं त्याचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. बँकिंग सेवेतील केवळ एक तृतीयांश हिस्सा या बँकांचा आहे.

    सरकार आणि संघटनांमध्ये काही चर्चा झाली आहे का?

    ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं (AIBEA) दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्त एस. सी. जोशी यांनी सरकार आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये 4, 9 आणि 10 मार्च रोजी सामंजस्य बैठक आयोजित केली होती. ‘बँकांचं खासगीकरण करण्याच्या निर्णयावर सरकार पुनर्विचार करण्यास तयार असेल तर संघटनांकडून संपावर जाण्याबाबत फेरविचार केला जाईल असा प्रस्ताव संघटनांच्या वतीनं देण्यात आला होता; मात्र अर्थ मंत्रालयाचे प्रतिनिधी अशी कोणतीही हमी देऊ शकले नाहीत. त्यामुळं सलोखा बैठकीत यावर कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला,’ असं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं स्पष्ट केलं.

    First published:
    top videos

      Tags: Bank, Bank strike, Money, Protest, Strike