जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price: आठवडाभरात सोनं किती महाग झालं? एक तोळ्यासाठी किती मोजावे लागतील

Gold Price: आठवडाभरात सोनं किती महाग झालं? एक तोळ्यासाठी किती मोजावे लागतील

Gold Price: आठवडाभरात सोनं किती महाग झालं? एक तोळ्यासाठी किती मोजावे लागतील

Gold Price: गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 50816 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर शुक्रवारी हा दर 50667 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अशाप्रकारे गेल्या आठवडाभरात सोन्याचा दर 149 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : सोन्याच्या दरात सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचा दर आजही 51 हजारांच्या खाली आहे. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्याचे दर वाढले आहेत. भारतीय सराफा बाजारात या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 22 जुलै रोजी सोन्याचा दर 50,677 रुपये प्रति तोळेवर ​​बंद झाला. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 50816 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर शुक्रवारी हा दर 50667 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अशाप्रकारे गेल्या आठवडाभरात सोन्याचा दर 149 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी सोन्याचा दर 50,629 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. यानंतर आठवडाभर दरात चढ-उतार होत राहिले, मात्र शुक्रवारी त्यात मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ दिसून आली. समुद्रकिनारी सापडली व्हेल माशाची 28 कोटींची उलटी; मच्छिमारांनी केलं चकित करणारं काम इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, या आठवड्यात सोमवारी 18 जुलै रोजी सोने सोने 50,629 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. मंगळवारी दर घसरले आणि सोनं 50,493 पर्यंत खाली आलं. बुधवारी सोन्याचा दर आणखी घसरला आणि तो 50,477 वर आला. गुरुवारी सोन्याच्या दरात सर्वाधिक घसरण नोंदवली गेली आणि तो 50,182 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा गाठला. पण या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आणि सोन्याची किंमत 50,677 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. शेअर बाजारात नुकसान टाळण्यासाठी काय कराल? Zerodha च्या निखिल कामत यांचा सल्ला कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात