नवी दिल्ली, 31 जुलै: भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करण्याचं तुमचं नियोजन असेल, तर त्याकरिता सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana-APY) हा अत्यंत उत्तम पर्याय ठरेल. कमी गुंतवणुकीत दरमहा पेन्शनची (Pension) हमी देणारी ही एक अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार 60 वर्षांनंतर दरमहा किमान 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. 40 वर्षं वयापर्यंतची व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन समाजातल्या सर्व घटकांना पेन्शनची सुरक्षा मिळावी या उद्देशानं सरकारनं ही योजना आणली आहे. विमा नियामक (Insurance Regulator) आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी या योजनेतली वयोमर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे. या योजनेत दरमहा ठराविक गुंतवणूक केल्यास वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा एक हजार ते 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकतं. यामध्ये तिमाही, सहामाही गुंतवणुकीचाही पर्याय आहे. दर सहा महिन्यांना 1239 रुपये जमा केल्यास 60व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन मिळू शकतं. हे वाचा- EPFO: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आज खात्यात येऊ शकते 8.5% व्याजाची रक्कम दरमहा गुंतवा 210 रुपये दरमहा 5 हजार रुपये पेन्शन (Pension) मिळवायचं असेल आणि वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही यात गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला दरमहा 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तिमाही गुंतवणूक करणार असाल तर 626 रुपये आणि सहामाही तत्त्वावर 1239 रुपये गुंतवणूक करावी लागेल. महिन्याला एक हजार रुपये पेन्शन अपेक्षित असेल, तर 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीला दरमहा फक्त 42 रुपये भरावे लागतील. हे वाचा- ऑगस्ट महिन्यात बँकांना आहेत बंपर सुट्ट्या, 15 दिवस आहेत Bank Holidays कमी वयात गुंतवणूक सुरू करणं फायद्याचं समजा, वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी आहे आणि तुम्ही वयाच्या 35व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केलीत, तर तुम्हाला 25 वर्षासाठी दर सहा महिन्यांनी 5323 रुपये भरावे लागतील. या प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल. 18व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास हीच रक्कम फक्त 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच एकाच पेन्शन रकमेसाठी उशिरा गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला 1.60 लाख रुपये अधिक भरावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.