मराठी बातम्या /बातम्या /मनी /

US Election 2020 : निवडणुकीदरम्यान घसरलं पण निवडणुकीनंतर पुन्हा वाढणार सोनं

US Election 2020 : निवडणुकीदरम्यान घसरलं पण निवडणुकीनंतर पुन्हा वाढणार सोनं

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा (US Election 2020)  कमोडिटी मार्केट, शेअर बाजार आणि सोन्याच्या दरावरही परिणाम पाहायला मिळतो आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा (US Election 2020) कमोडिटी मार्केट, शेअर बाजार आणि सोन्याच्या दरावरही परिणाम पाहायला मिळतो आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा (US Election 2020) कमोडिटी मार्केट, शेअर बाजार आणि सोन्याच्या दरावरही परिणाम पाहायला मिळतो आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : जगातील सर्वात शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची (US Election 2020) मतमोजणी सुरू आहे. डेमोक्रेटिक पार्टीचे जो बायडन आणि रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काटे की टक्कर आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणाकडे अमेरिकेची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. भारतासहित जगभरातील सर्वच बाजाराचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. अमेरिकेतील या निवडणुकीचा परिणाम भारतासहित जगभरातील अनेक बाजारांमध्ये चढउतार पाहायला मिळणार आहे.

मंगळवारी अमेरिकन बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. आघाडीचा बेंचमार्क इंडेक्स डाउ जोन्स 554 अंकांच्या वाढीसह बंद झाला. याव्यतिरिक्त तंत्रज्ञान समभागांचा नॅसडॅक इंडेक्स 202 अंकांनी वधारला आहे. त्याचवेळी एस अँड पीमध्ये 58 अंकांची वाढ दिसून आली.

2016 ते 2020 दरम्यान अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता होती. या कालखंडात अमेरिकेतील बाजारात काय स्थिती होती पाहुयात

एस अँड पी 500 - 54.7%

एमएससीआय  इएम  - 23.5%

सोनं - 48.4%

तेल  - (-18.2%)

डॉलर इंडेक्स  - (-4.0%)

हे वाचा - US Election 2020 च्या निकालाच्या प्रतीक्षेदरम्यान घसरलं सोनं, हे आहेत आजचे दर

मागील चार वर्षांत एस अँड पी 500 इंडेक्समध्ये 54.7 टक्क्यांनी वाढ दिसून आली  आहे. याशिवाय एमएससीआय ईएममध्येही 23.5 टक्के वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर सोनं 48.4 टक्के राहिलं. याशिवाय मागील टर्मच्या तुलनेत कच्च्या तेलामध्ये -18.२ टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्समध्ये देखील -4.0 टक्क्यांची घसरण नोंदली गेली.

सोन्याला येणार तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारानं मोठा रेकॉर्ड गाठला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यास शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळेल. याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर देखील होणार आहे. ट्रम्प यांचा पराभव झाल्यास इक्विटी बाजार कोसळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर लोकं मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करतील. यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हे वाचा - पत्नीला दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?

यूबीएस ग्रुप एजीमधील असेट डिस्ट्रिब्युशन प्रमुख, अ‍ॅड्रियन झुरचर येत्या काही महिन्यांबाबत आशावादी आहेत. मात्र राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन  आम्ही गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्याचा सल्ला देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर इतर  पर्यायामध्ये काही रेखीय इक्विटी एक्सपोजर समाविष्ट केले गेले आहेत. यामुळे घसरण आणि वाढत्या बाजारात सकारात्मक परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.  ट्रम्प यांच्या विजयामुळे भारतीय शेअर बाजारावर हाँगकाँगच्या तुलनेत दबाव येऊ शकत असल्याचे अ‍ॅड्रियन झुरचर यांनी म्हटले आहे.

गुंतवणूकदारांनी राहा सावध

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कुणीही जिंकलं तरी गुंतणूकदारांना सावध राहण्याची गरज आहे, असं तज्ज्ञ म्हणाले.  तसंच निवडणुकीच्या निकालांवर कोणताही निर्णय घेऊ नये. कोणताही उमेदवार जिंकल्यास लॉन्ग टर्म गुंतवणुकीवर फरक पडत नाही. निवडणुकीव्यतिरिक्त इतर देखील अनेक गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये व्हॅल्युएशन, व्याजदर आणि महागाई या सर्व गोष्टींचा यावर प्रभाव पडत असतो.

बॉण्ड यील्ड आणि सोने

ज्युलियस बायरचे मार्क मॅथ्यूज यांनी सांगितलं, सोन्यापेक्षा बॉण्ड  किंवा उच्च ग्रेड बॉण्ड अधिक चांगले गुंतवणुकीचे पर्याय आहेत.  कारण सोन्याने यावर्षी हे सिद्ध केले आहे की हे जोखीम नसणाऱ्या मालमत्तेपेक्षा अधिक जोखीम मुक्त आहे. याव्यतिरिक्त, जॉन्स हेंडरसन इन्व्हेस्टर्सचे मालमत्ता प्रमुख पॉल ओकॉनर यांनी आशा व्यक्त केली, मजबूत डेमोक्रॅट सरकारच्या अंमलबजावणीत वित्तीय एकत्रीकरण करता येईल. यामुळे बॉंडमधील गुंतवणुकीत वाढ होईल.  ओ-कॉनॉरचा असा अंदाज आहे की 10 वर्षांच्याअमेरिकेच्या तिजोरीतील यिल्डमध्ये  1% वाढ होऊ शकते. डेमोक्रॅट सरकारच्या दिलाशावर देखील अवलंबून असणार आहे.

First published:

Tags: Gold, US President