जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पत्नीला घराखर्चासाठी दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?

पत्नीला घराखर्चासाठी दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?

पत्नीला घराखर्चासाठी दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?

कोरोना संकटकाळात (Coronavirus Pandemic) अनेकांनी डिजिटल पेमेंट पद्धती स्विकारली आहे. अशावेळी नोकरी करणाऱ्या पतीकडून त्याच्या पत्नीला घरखर्चासाठी रक्कम देतानाही ती ऑनलाइन ट्रान्सफर करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: कोरोना संकटकाळात (Coronavirus Pandemic) खरेदी करताना लोकांनी आपल्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल केला आहे. आता बहुतेक लोक संक्रमण टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहेत. दररोजच्या खरेदीसाठीही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर जास्त खरेदी केली जात आहे. अशा परिस्थितीत, जर आपण दर महिन्याला आपल्या घराच्या खर्चासाठी आपल्या पत्नीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत असाल तर मग पत्नीला आयकर नोटीस (Income Tax Notice)  मिळेल का? किंवा आपण या पैशाला गिफ्ट मनी (Gift Money) म्हणून कर कपातीचा (Tax Deduction) फायदा घेऊ शकता. जर पतीकडून मिळणारे पैसे गुंतवले तर आयकर भरावा लागेल आपण घराच्या खर्चासाठी दर महिन्याला पैसे दिले किंवा गिफ्ट म्हणून दिले तर त्यावर पत्नीला कर द्यावा लागत नाही. या दोन्ही प्रकारच्या पैशांना केवळ पतीचं उत्पन्न समजलं जाईल. यावर बायकोला कोणताही कर भरावा लागणार नाही. जर आपल्याला सोप्या शब्दात सांगायचं तर पत्नीला या रकमेसाठी आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस मिळणार नाही. परंतु, जर पत्नीने या पैशांची पुन्हा गुंतवणूक केली आणि त्यातून उत्पन्न मिळवलं तर मिळालेल्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. गिफ्टमध्ये दिलेल्या पैशांवर करात कोणतीही सूट नाही आयकर कायद्यानुसार आपण जर आपल्या मिळकतीव्यतिरिक्त रकमेतून आपल्या पत्नीला भेट म्हणून पैसे दिले तर कायदेशीररित्या ते चुकीचं नाही. परंतु आपल्याला त्यावर कोणत्याही प्रकारच्या करात सूट मिळणार नाही. इनकम टॅक्स कायद्यांतर्गत जर तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या मिळकतीव्यतिरिक्त रकमेतून गिफ्ट म्हणून पैसे दिले तर ते तुमचं उत्पन्न मानलं जाईल आणि कराचीही जबाबदारी तुमच्यावर असेल. खरं तर हे स्पाउस रिलेटिव्स या श्रेणीमध्ये येतात. अशा परिस्थितीत अशा गिफ्ट ट्रान्झॅक्शनवर कोणताही कर लावला जात नाही. (हे वाचा- जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून करा ऑफिसचं काम, ही भारतीय कंपनी आखतेय योजना ) (हे वाचा- LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर? ) जर आपण दर महिन्याला आपल्या पत्नीच्या खात्यात काही रक्कम पाठवत असाल आणि ती एसआयपीमार्फत (SIP) म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत असेल तर तिला या पैशावर आयकर रिटर्न भरण्याची गरज नाही किंवा तिला कोणताही कर भरावा लागणार नाही. या पैशांच्या गुंतवणूकीतून मिळालेले उत्पन्न पतीच्या करपात्र उत्पन्नात जोडले जाईल. परंतु पत्नीने गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नाची पुन्हा गुंतवणूक केली तर त्यावर मिळालेल्या उत्पन्नावर पत्नीला आयकर भरावा लागेल. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही प्रकारे उत्पन्न असल्यास आयटीआर दाखल करणं अधिक चांगले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात