जाहिरात
मराठी बातम्या / मनी / दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज? सरकार घोषणा करण्याच्या तयारीत

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज? सरकार घोषणा करण्याच्या तयारीत

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज? सरकार घोषणा करण्याच्या तयारीत

सरकार लवकरच MSP ची घोषणा करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

असीम मनचंदा, नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून रब्बी पिकांसाठी MSP ची घोषणा करण्यात आली नाही. ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होते. मात्र यावेळी उशीर झाल्याने शेतकरी आतूरतेनं याची वाट पाहात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच MSP ची घोषणा करू शकते. CACP ने रब्बी पिकांसाठी ३ ते ९ टक्क्यांपर्यंत MSP वाढवण्याची शिफारस केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून चर्चा करून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गहूसोबत सरकार ६ वेगवेगळ्या पिकांसाठी MSP तयार करत आहे. डाळींवरील MSP सर्वात जास्त वाढण्याची शक्यता आहे. गहू, चणा-मसून, मोहरी, सूर्यफुलावरील MSP निश्चित करण्यात आला आहे. MSP म्हणजे काय? पिकाची जी आधारभूत किंमत ठरवली जाते त्याला MSP असं म्हणतात. ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्यांच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देतं त्याला MSP म्हणतात.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

MSP का ठरवलं जातं? शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये यासाठी सरकार किमान आधारभूत किंमत निश्चित करतं. राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालय एकत्र चर्चा करून MSP ठरवतात. रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांसाठी MSP निश्चित केला जातो.

News18लोकमत
News18लोकमत
PM Swanidhi Yojana: व्यवसायासाठी हमीशिवाय मिळतं कर्ज, ‘ही’ आहे सरकारची खास योजना

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्वी MSP जाहीर करण्याच्या सूचना दिला होत्या. मात्र यासाठी काही कारणांनी उशीर झाला आहे. आता लवकरच MSP जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात