या दिवाळीला 10 रुपयांची नोट करेल तुम्हाला मालामाल! असे मिळतील हजारो रुपये

या दिवाळीला 10 रुपयांची नोट करेल तुम्हाला मालामाल! असे मिळतील हजारो रुपये

या दिवाळीला 10 रुपयांची नोट तुमच्यासाठी हजारो रुपयांची कमाई करुन देणारं साधनं ठरू शकतो. वाचा काय आहे ही स्कीम...

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: या दिवाळीला (Diwali 2020) 10 रुपयांची नोट तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. तुमच्याकडे देखील ही खास 10 ची नोट असेल तर तुम्हाला थेट 25 हजार रुपये मिळू शकतात. विशेष म्हणजे ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट करण्याची देखील आवश्यकता नाही.

तुमच्याकडे आहे का ही 10 ची नोट?

आजकाल चलनात नवीन नोटा आल्या आहेत, पण जुन्या नोटा गायब झाल्या आहेत. अशावेळी तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही ही कमाई करू शकता. ही ती नोट आहे ती काही वर्षांपूर्वी भारतामध्ये चालत होती. ब्रिटिश कालीन भारतात अशा काही नोटा चलनात होत्या, ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही आहे. सुरुवातीला 10 च्या नोटेवर अशोक स्तंभ होता, 3 सिंहांचे तोंड असणारी ही नोट आता फारच दुर्लभ झाली आहे. मात्र तुमच्याकडे ही नोट असेल तर तुमचं नशीब फळफळण्याची ही संधी आहे.

किती मिळतील पैसे?

या एका नोटेच्या बदल्यात 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतील. सर्वात चांगली बाब ही आहे की ही नोट तुम्ही घरबसल्या ऑनलाइन विकू शकता.

दिवाळीपूर्वी या बँकेने स्वस्त केलं होम लोन; जाणून घ्या किती कमी होईल EMI

10 च्या नोटेची कुठे विक्री करता येईल?

इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर या नोटांना चांगल्या किंमतीत विकता येईल. या सर्व प्लॅटफॉर्मवर नोटेची किंमत चांगली मिळेल. या कंपन्यांच्या साइटवर जाऊन तुम्ही तुमच्याकडील नोटेची विक्री करू शकता. या बदल्यात तुम्हाला 25 हजारापर्यंत रक्कम मिळेल.

धुम्रपानामुळे केवळ आरोग्याबाबतच नाही तर विमा मिळण्यातही अडचणी, निवडा अशी योजना

1943 मध्ये जारी झाली होती ही नोट

ही नोट ब्रिटिश काळात 1943 मध्ये जारी करण्यात आली होती. या नोटेवर सी डी देशमुख यांची स्वाक्षरी आहे. 10 रुपयाच्या या जुन्या नोटेवर एकीकडे अशोक स्तंभ आणि दुसरीकडे नाव आहे. तर या नोटेच्या पाठीमागे दोन्हीकडे इंग्रजीमध्ये 10 Rupees लिहले आहे.

या वेबसाईटवर करू शकता नोटेची विक्री

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

First published: November 11, 2020, 1:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या