• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: 5 महिन्यातील निचांकी पातळीवर सोन्याचे दर, पण लवकरच गाठणार 50 हजारांचा टप्पा

Gold Price Today: 5 महिन्यातील निचांकी पातळीवर सोन्याचे दर, पण लवकरच गाठणार 50 हजारांचा टप्पा

Gold Price Today: या आठवड्याच्या सुरुवातीला भारतामध्ये सोन्याचे दर गेल्या पाच महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचले होते. या आठवड्यात साधारण सोन्याचे दर 46,000-46,500 रुपये प्रति तोळाच्या रेंजमध्ये राहिले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: या आठवड्याच्या सुरुवातीला भारतामध्ये सोन्याचे दर गेल्या (Gold Rates today) पाच महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचले होते. या आठवड्यात साधारण सोन्याचे दर 46,000-46,500 रुपये प्रति तोळाच्या रेंजमध्ये राहिले आहेत. गेल्यावर्षीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा साधारण 10000 रुपयांनी सोन्याचे दर कमी राहिले आहेत. जाणकारांच्या मते, सुधारलेल्या अमेरिकन एम्प्लॉयमेंट डेटा आणि मजबुत अमेरिकन डॉलरमुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. या महिन्यात स्पॉट गोल्डची किंमत (Spot Gold Price) साधारण 2,100 रुपये प्रति तोळाने कमी झाली आहे. रिलायन्स सिक्योरिटीजचे सीनिअर रिसर्च अनालिस्ट श्रीराम अय्यर (Sriram Iyer- senior research analyst at Reliance Securities) यांच्या मते, या वर्षाअखेरपर्यंत सोन्याचे दर 50000 रुपये प्रति तोळावर पोहचू शकतात. कोविडची दुसरी लाट रोखण्यासाठी लागू करणयात आलेले निर्बंध कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू खुली होत आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढेल, असा विश्वास ज्वेलर्स आणि विश्लेषकांनी व्यक्त केला. अय्यर यांच्या मते अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात होताच पेंट-अप डिमांडमुळे वर्षाअखेरपर्यंत सोन्याचे दर सर्वोच्च होतील. हे वाचा-Jandhan Account: केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी त्यांनी असा सल्ला दिला आहे की, सोन्याचे दर कमी होत असतील तर त्यात गुंतवणूक करायला हवी. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते, यावर्षी एप्रिल-जून तिमाहीमध्ये सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. या तिमाहीत 19.2 टक्क्यांनी सोन्याची मागणी वाढून 76.1 टन झाली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: