Home /News /money /

Gold Price Today : लग्नसराईच्या दिवसांत वाढली सोन्याची मागणी, 51 हजारजवळ पोहोचला भाव, तपासा आजचा रेट

Gold Price Today : लग्नसराईच्या दिवसांत वाढली सोन्याची मागणी, 51 हजारजवळ पोहोचला भाव, तपासा आजचा रेट

Gold Price Today: सोन्याचा भाव 50 हजारच्या खाली होता. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये मागणी वाढल्याने पुन्हा एकदा दर वाढले आहेत.

    नवी दिल्ली, 24 मे : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारादरम्यान मंगळवारी भारतीय बाजारात सोने वाढ झाली आहे. सोन्याचा दर (Gold price) पुन्हा एकदा वाढून 51 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 40 रुपयांनी वाढून 50,947 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याआधी सोन्याचा दर 50,940 रुपये ओपन झाला होता. परंतु मागणी वाढल्याने यात 0.08 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. याआधी सोन्याचा भाव 50 हजारच्या खाली होता. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये मागणी वाढल्याने पुन्हा एकदा दर वाढले आहेत. चांदीचा भाव - आज चांदीच्या दरात घसरण झाली. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा वायदे भाव 154 रुपयांच्या घसरणीसह 61,144 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. याआधी चांदीचा भाव 61,349 रुपयांवर ओपन झाला आणि 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 61 हजारांवर आला. या महिन्याच्या सुरुवातीला चांदीचा भाव 70 हजारवर ट्रेड करत होता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - Gold Price: सोने दरात वाढ होणार की भाव घसरणार? हे 5 फॅक्टर्स ठरतील कारणीभूत

    22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या