सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. MCX वर चांदीचा भाव (Silver Price Today) 382 रुपयांनी वाढून 62,498 रुपये प्रति किलो झाला. सकाळी 62,277 च्या भावाने चांदीचा व्यवहार उघडपणे सुरू झाला.
मुंबई, 30 मे : जागतिक बाजाराच्या (Global Market) दबावाखाली सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) उसळी आली आणि सोन्याने पुन्हा एकदा 51 हजारांचा टप्पा पार केला. चांदीची चमकही आज वाढली असून तो 62 हजारांच्या वर व्यवहार करत आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 139 रुपयांनी वाढून 51,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. याआधी सोन्याचा व्यवहार 50,974 वर उघडपणे सुरू झाला होता, मात्र वाढत्या मागणीमुळे फ्युचर्सच्या किमती 0.27 टक्क्यांनी वाढून 51 हजारांच्या पुढे गेल्या. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात (Gold Price Today) सातत्याने घसरण होत होती.
UPI 123Pay: इंटरनेटशिवाय एक कॉल करुन UPI द्वारे पैसे करा ट्रान्सफर; 'हे' फोन नंबर्स लक्षात ठेवाचांदीची किंमतही वाढली
सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. MCX वर चांदीचा भाव (Silver Price Today) 382 रुपयांनी वाढून 62,498 रुपये प्रति किलो झाला. सकाळी 62,277 च्या भावाने चांदीचा व्यवहार उघडपणे सुरू झाला. मात्र सतत वाढत्या मागणीमुळे, त्याचे फ्युचर्स लवकरच 0.61 टक्क्यांनी वाढून 62,500 रुपये प्रति किलोवर पोहोचले.
जागतिक बाजारपेठेतही तेजी
जागतिक बाजारातही आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. यूएस सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.62 टक्क्यांनी वाढून 1,861.32 डॉलर प्रति औंस झाली, तर चांदीची किंमत 0.87 टक्क्यांनी वाढून 22.23 डॉलर प्रति औंस झाली. जागतिक बाजारातील या तेजीचा परिणाम आज भारतीय बाजारावरही चांगलाच दिसून आला आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करतीलसोन्याची किंमत वाढण्याच कारण काय?
सोन्याची मागणी वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलरची कमजोरी आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे, यूएस बॉन्डचे उत्पन्न देखील कमी झाले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षितेच्या शोधात पुन्हा एकदा सोन्याकडे वळाले. त्याचा थेट फायदा सोन्याच्या मागणीवर होत असून भावही वाढत आहेत. जागतिक बाजारपेठेचा परिणाम भारतासह इतर किरकोळ बाजारांवरही दिसून येईल.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.