मुंबई, 30 मे : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला डिजिटल पेमेंट (Digital Payment) मोड म्हणून उदयास आला आहे. डिजिटल पेमेंटसाठी UPI सारखी सुविधा तुम्हाला तुमच्या घरातून सहज पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी, तुम्हाला Paytm, Phonepe, BHIM, Google Pay इत्यादीसारख्या UPI सपोर्टिंग अॅप्सची आवश्यकता होती. पण तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्ही तुमच्या फीचर फोनच्या मदतीने इंटरनेट न वापरता कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता. फीचर फोनवरून इंटरनेटशिवायही तुम्ही UPI पेमेंट करू शकता हजारो फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे UPI ची नवीन आवृत्ती UPI 123Pay सादर केली आहे. UPI 123Pay सह, आता ज्या वापरकर्त्यांकडे इंटरनेटसह स्मार्टफोन नाही ते देखील UPI व्यवहार करू शकतील. या सुविधेद्वारे फीचर फोन वापरकर्ते 4 प्रकारे UPI व्यवहार करू शकतात. वापरकर्ते इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR), अॅप बेस्ड पेमेंट, प्रॉक्सिमिटी साउंड बेस्ड पेमेंट आणि मिस्ड कॉलद्वारे पेमेंट करू शकतात. शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करतील सध्या, आम्ही येथे IVR द्वारे UPI पेमेंटबद्दल माहिती देत आहोत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. प्रथम तुम्हाला UPI आयडी बनवावा लागेल सर्वप्रथम, तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून IVR नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा. UPI आयडी तयार करण्यासाठी आणि UPI पिन तयार करण्यासाठी सूचना फॉलो करा. Post Office च्या योजनांद्वारे कमाईची संधी, ‘या’ तीन स्कीम्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा परतावा IVR द्वारे UPI 123Pay कसे वापरावे? » तुमच्या फोनवरून IVR नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा. » आता तुमची पसंतीची भाषा निवडा. » यानंतर UPI शी संबंधित बँक निवडा. » पुष्टी करण्यासाठी ‘1’ प्रविष्ट करा. » पैसे पाठवण्यासाठी ‘1’ दाबा. » ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाका. » डिटेल्स चेक करा. » आता रक्कम टाका. » शेवटी UPI पिन टाकून पैसे ट्रान्सफर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.