नवी दिल्ली, 29 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे मंगळवारी सोने-चांदी दरात (Gold-Silver Price) घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव अनेक दिवसांनंतर 68000 हून खाली उतरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा वायदे भाव 198 रुपयांनी कमी होऊन 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold Price Today) आहे. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे. याआधी सोन्याचा भाव बाजारात 51,342 च्या रेटवर ओपन झाला होता. चांदीचा भावही उतरला - MCX वर चांदीचा वायदे भावही सकाळी सुरुवातीच्या वेळेत घसरला होता. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदी वायदे भाव 199 रुपयांच्या नुकसानासह 67,906 रुपये प्रति किलोग्रॅम (Silver Price Today) आहे. चांदीचा भाव सकाळी 67,890 वर ओपन झाला होता. त्यानंतर काहीशा वाढीसह ट्रेड करत आहे. मागील चांदीच्या दराच्या तुलनेत आज भाव अधिक उतरला आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दर घसरला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. रशिया - युक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध संपलं तर ग्लोबल मार्केटमध्ये सोने दरात मोठी घसरण होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकण्याचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात. युक्रेनने रशियाच्या अटी मानून युद्ध संपवल्याचे संकेत दिले आहेत.
हे वाचा - Petrol Diesel Prices Hike : मुंबईत आज सर्वाधिक पेट्रोल दरवाढ, पाहा एक लीटर पेट्रोलचा काय आहे भाव
कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.