Home /News /money /

Petrol Diesel Prices Hike : मुंबईत आज सर्वाधिक पेट्रोल दरवाढ, पाहा एक लीटर पेट्रोलचा काय आहे भाव

Petrol Diesel Prices Hike : मुंबईत आज सर्वाधिक पेट्रोल दरवाढ, पाहा एक लीटर पेट्रोलचा काय आहे भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील चार महागरांसह इतर शहरात प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेल दर वाढवला आहे. मुंबईत सर्वाधिक 85 पैसे प्रति लीटरने पेट्रोल महागलं आहे.

    नवी दिल्ली, 29 मार्च : सरकारी तेल कंपन्यांनी आपल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) दरात मोठी वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मागील जवळपास आठवड्याभरापासून पेट्रोल-डिझेल किमतीत वाढ होत आहे. आजही मंगळवारी पेट्रोल दर 80-85 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 70-75 पैसे प्रति लीटरने महागलं (Petrol-Diesel Price Today) आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील चार महागरांसह इतर शहरात प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेल दर वाढवला आहे. मुंबईत सर्वाधिक 85 पैसे प्रति लीटरने पेट्रोल महागलं आहे. काल सोमवारी पेट्रोल दर 30 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर महागलं होतं. आज त्याहून अधिक वाढ झाली आहे. मागील जवळपास आठ दिवसांत इंधन दर 4 रुपयांहून अधिक वाढला आहे.

    हे वाचा - येत्या 1 एप्रिलपासून टॅक्ससंबंधी 'हे' नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा डिटेल्स

    चार महानगरांत पेट्रोल-डिझेल जर - - दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपये प्रति लीटर - मुंबईमध्ये पेट्रोल 115.04 रुपये आणि डिझेल 99.25 रुपये प्रति लीटर - चेन्नईत पेट्रोल 105.94 रुपये आणि डिझेल 96.00 रुपये प्रति लीटर - कोलकातामध्ये पेट्रोल 109.68 रुपये आणि डिझेल 94.62 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - दर महिना 6000 रुपये गुंतवणूक करुन बनाल करोडपती, पाहा कसं आहे Calculation

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price hike

    पुढील बातम्या