विवाहित असूनही प्रेमात पडली होती अभिनेत्री, पहिल्या पतीकडून घटस्फोट घेत केलं दुसरं लग्न

विवाहित असूनही प्रेमात पडली होती अभिनेत्री, पहिल्या पतीकडून घटस्फोट घेत केलं दुसरं लग्न

आधीच विवाहित असतानाही हीअभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडली आणि मग पहिल्या पतीला घटस्फोट देत तिनं दुसरं लग्न केलं.

  • Share this:

मुंबई, 14 जून :  अभिनेत्री किरण खेर आज बाॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी किरण यांनी बॉलिवूड अक्षरशः गाजवलं. पण, फार कमी लोकं आहेत ज्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहीत आहे. अगोदरच विवाहित असतानाही किरण पुन्हा एकदा प्रेमात पडल्या त्यांच्या लव्हस्टोरीत बरेच अडथळे होते मात्र त्यांनी ते पार केले आणि शेवटी प्रेमाचा विजय झाला.

कामानिमित्त मुंबईत आलेल्या किरण सुरुवातीला  गौतम बेरी यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. 1980 मध्ये चंदीगढमध्ये त्यांची ओळख अनुपम खेर यांच्याशी झाली. ते दोघंही एका नाटकाच्या ग्रुपमध्ये होते. या काळात अनुपम आपल्या खासगी आयुष्यात कठीण परिस्थितीतून जात होते. यावेळी किरण यांच्या रुपात अनुपम यांना एक चांगली मैत्रीण भेटली. अनुपम आणि किरण नाटकासाठी अनेकदा एकत्रच प्रवास करायचे. यादरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हीच मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलेल याची या दोघांनाही कल्पना नव्हती.

अनलॉक 1 मध्ये बॉयफ्रेंडसोबत बाइकवरून फिरताना दिसली श्रद्धा कपूर, Video Viral

किरण खेर यांनी त्यांच्या आणि अनुपम यांच्या नात्याविषयी एका मुलाखतीमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. किरण एकदा कामानिमित्त मुंबईला आल्या होत्या. यावेळी त्यांची ओळख गौतम बेरी यांच्याशी झाली. काही दिवसांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसांत हे नातं फार काळ टिकू शकणार नाही याची जाणीव त्यांना झाली.

या मुलाखतीत किरण म्हणाल्या,  एकीकडे अनुपम विवाहीत होते आणि त्यांच्या आयुष्यातही बऱ्याच समस्या होत्या. पण तरीही आम्ही खूप चांगले मित्र होतो. नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी कोलकाताला जात असताना ते मला खूप वेगळे वाटले. त्यांनी डोक्यावरचे सर्व केस काढले होते. कदाचित कुठल्यातरी चित्रपटातील त्यांचा हा लूक होता. आपल्या मेकअप रुममधून बाहेर पडताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी आहे हे मला जाणवलं. तो क्षण आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी पुरेसा होता, अशी कबुली किरण यांनी एका मुलाखतीत दिली होती.

कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी

किरण म्हणाल्या, ‘काही वेळाने त्यांनी माझ्या रुमचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाले मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलोय असं म्हणत अनुपम यांनी प्रेमाची कबुली दिली.’ त्यानंतर किरण आणि अनुपम यांनी आपापल्या पार्टनरशी घटस्फोट घेतला आणि 1985 मध्ये त्यांनी गुडगावमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं.

श्वेता तिवारीच्या Ex Husband ने शेअर केले पर्सनल चॅट, अभिनेत्रीला संताप अनावर

First published: June 14, 2020, 8:41 AM IST

ताज्या बातम्या