Home /News /money /

Gold Price Today : सोने दरात वाढ, पुन्हा 51 हजारजवळ; चांदीही 62 हजार पार

Gold Price Today : सोने दरात वाढ, पुन्हा 51 हजारजवळ; चांदीही 62 हजार पार

Gold and Silver price: या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार सत्रात सोने दरात घसरण झाली होती. परंतु आज ग्लोबल मार्केटमधील संकेतांनंतर यात वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली, 27 मे : आंतरराष्ट्रीय मार्केटमधील दबावामुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold and Silver price) वाढ पाहायला मिळाली. सोनं आज पुन्हा एकदा 51000 रुपयांजवळ पोहोचलं आहे. तर चांदीचा भाव 62 हजारांवर आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 60 रुपयांच्या वाढीसह 50,931 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याआधी सोन्याचा भाव 50,952 ओपन झाला. यावेळी सोने दरात मागील किमतीच्या तुलनेत 0.12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार सत्रात सोने दरात घसरण झाली होती. परंतु आज ग्लोबल मार्केटमधील संकेतांनंतर यात वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही वाढ - सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. MCX वर सकाळी चांदीचा वायदे भाव 319 रुपयांनी वाढून 62,112 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. याआधी चांदीचा भाव 61,980 रुपयांवर ओपन झाला. परंतु मागणी वाढल्याने यात तेजी आली. हा दर वाढून 0.54 टक्क्यांची वाढ होत भाव 62 हजारांवर पोहोचला. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.

    हे वाचा - SIP: ‘या’ आहेत कोट्यधीश बनवणाऱ्या 6 म्युच्युअल फंड स्किम

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या