Home /News /money /

SIP: ‘या’ आहेत कोट्यधीश बनवणाऱ्या 6 म्युच्युअल फंड स्किम

SIP: ‘या’ आहेत कोट्यधीश बनवणाऱ्या 6 म्युच्युअल फंड स्किम

म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा अधिक सुरक्षित मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic investment plan) म्हणजेच SIP होय. हा एक दीर्घकालीन पर्याय आहे, ज्यामध्ये बाजारातील अनेक जोखीमा कमी होतात.

नवी दिल्ली, 27 मे : आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual Fund). म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचं असतं. बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा (Return) यात मिळतो. दरमहा अगदी किमान ठराविक रक्कम भरूनही यात गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंड हा इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याचा सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये, म्युच्युअल फंड मॅनेजर (Mutual Fund Manager) कोणत्याही स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना डायव्हर्सिफिकेशनचा फायदा होतो. खरंतर म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा अधिक सुरक्षित मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic investment plan) म्हणजेच SIP होय. हा एक दीर्घकालीन पर्याय आहे, ज्यामध्ये बाजारातील अनेक जोखीमा कमी होतात. अॅडव्हायजर नेहमी दीर्घकाळ एसआयपी चालवण्याबद्दल सांगतात, यामुळे चक्रवाढ व्याजाचा खूप फायदा होतो. तर अशाच चांगला परतावा देणाऱ्या काही महत्त्वाच्या म्युच्युअल फंडांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याबद्दल फायनॅन्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिलंय. जास्त रिटर्न देणाऱ्या काही म्युचुअल फंडाचे प्रोफाईल ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड (ICICI Prudential Technology Fund) - 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 20% वार्षिक 5000 मासिक SIP ची व्हॅल्यू: 1.25 कोटी रुपये 1 लाख एकरकमी गुंतवणूकीची व्हॅल्यू: 42.37 लाख रुपये मिनिमम SIP: 100 रुपये अॅसेट्स: 8478 कोटी (30 एप्रिल 2022 पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 2.03% (30 एप्रिल 2022 पर्यंत) SBI Consumption Opportunities Fund - 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 19% वार्षिक 5000 मासिक SIP ची व्हॅल्यू : 1.14 कोटी रुपये 1 लाख रुपये एकरकमी गुंतवणुकीची व्हॅल्यू : 42.43 लाख रुपये मिनिमम SIP : 500 रुपये अॅसेट्स: 953 कोटी (30 एप्रिल 2022 पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 2.51% (30 एप्रिल 2022 पर्यंत) SBI Magnum Global Fund - 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 18.75% वार्षिक 5000 मासिक SIP ची व्हॅल्यू: 1.05 कोटी रुपये 1 लाख रुपये एकरकमी गुंतवणुकीची व्हॅल्यू: 53 लाख रुपये मिनिमम SIP: 500 रुपये अॅसेट्स: 4953 कोटी (30 एप्रिल 2022 पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 2.03% (30 एप्रिल 2022 पर्यंत) निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड - 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 19% वार्षिक 5000 मासिक SIP ची व्हॅल्यू: 1.12 कोटी रुपये 1 लाख एकरकमी गुंतवणुकीची व्हॅल्यू: 73 लाख रुपये मिनिमम SIP: 100 रुपये अॅसेट्स: 12,178 कोटी (३० एप्रिल २०२२ पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 1.89% (३० एप्रिल २०२२ पर्यंत) SBI Large & Midcap Fund - 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 18.22% वार्षिक 5000 रुपये मासिक SIP ची व्हॅल्यू: 1 कोटी रुपये 1 लाख एकरकमी गुंतवणुकीची व्हॅल्यू: 44 लाख रुपये किमान SIP: 500 रुपये अॅसेट्स: 6599 कोटी (30 एप्रिल 2022 पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 2.08% (30 एप्रिल 2022 पर्यंत) ICICI Prudential FMCG Fund 20 वर्षांमध्ये SIP रिटर्न: 18.53% वार्षिक 5000 रुपये मासिक SIP ची व्हॅल्यू: 1 कोटी रुपये 1 लाख एकरकमी गुंतवणुकीची व्हॅल्यू: 41 लाख रुपये किमान SIP: 100 रुपये अॅसेट्स: 908 कोटी (30 एप्रिल 2022 पर्यंत) एक्सपेन्स रेशो: 2.50% (30 एप्रिल 2022 पर्यंत) खरं तर SIP मध्ये गुंतवणूकदारांना फंडात एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी मासिक गुंतवणुकीची सुविधा मिळते. असे अनेक फंड आहेत, ज्यामध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. लहान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. त्यांना त्यांच्या बचतीतून दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागते. याच्या माध्यमातून ते वेळोवेळी त्यांच्या गुंतवणुकीचा आढावाही घेऊ शकतात. ज्याच्या आधारावर SIP टॉपअप किंवा पॉज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. गुंतवणुकदारांना दीर्घकाळात कोट्यधीश बनवणाऱ्या अनेक योजना बाजारात आहेत.

हे वाचा - 200 रुपयांच्या SIP द्वारे कसं आणि किती दिवसांत बनू शकता कोट्यधीश, समजून घ्या Calculation

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) किंवा इतर ठिकाणी गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो. शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते. अशा कंपनीला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) म्हटलं जातं. ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना सादर करत असते. त्यात आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचं व्यवस्थापन ही कंपनी करते. ही कंपनी या सर्व निधीची एकत्रितरीत्या शेअर्स (Shares-Equity), सरकारी रोखे (Government Bonds), डिबेंचर्स (Debentures) आदी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करते आणि त्यावर जो काही नफा- तोटा होतो तो सर्वांना वाटला जातो.
First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds, Savings and investments

पुढील बातम्या