मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Investment: सोन्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही देखील होऊ शकता मालामाल, हे आहेत 4 पर्याय

Gold Investment: सोन्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही देखील होऊ शकता मालामाल, हे आहेत 4 पर्याय

Investment in Gold: सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आजही अनेकांसाठी पहिली पसंती दागिनेच असतात. मात्र असेही काही पर्याय आहेत जे तुम्हाला दागिन्यांपेक्षा जास्त रिटर्न देतील

Investment in Gold: सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आजही अनेकांसाठी पहिली पसंती दागिनेच असतात. मात्र असेही काही पर्याय आहेत जे तुम्हाला दागिन्यांपेक्षा जास्त रिटर्न देतील

Investment in Gold: सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आजही अनेकांसाठी पहिली पसंती दागिनेच असतात. मात्र असेही काही पर्याय आहेत जे तुम्हाला दागिन्यांपेक्षा जास्त रिटर्न देतील

नवी दिल्ली, 20 जून: तुम्हाला देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) करताना आजही अनेकांसाठी पहिली पसंती दागिनेच असतात. मात्र असेही काही पर्याय आहेत जे तुम्हाला दागिन्यांपेक्षा जास्त रिटर्न देतील.सोन्याच्या दागिन्याऐवजी अर्थात फिजिकल गोल्ड ऐवजी तुम्ही कोणत्या पर्यायात गुंतवणूक करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जगभरात भारत असा दुसरा देश आहे ज्याठिकाणी सोन्याची मागणी (Demand of Gold in India) सर्वाधिक आहे. भारतामध्ये सोनेखरेदीकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरा म्हणून देखील पाहिलं जातं. भारतीयांसाठी सोनं (Gold Rates Today) हा एक शुद्ध धातू आहे.

याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक हा एक सुरक्षित पर्याय आहे. भारतात सोन्याला एवढं महत्त्व आहे की लग्नसमारंभाच्या बजेटमधील (Gold Investment) एक मोठा हिस्सा सोनेखरेदीसाठी वापरला जातो. दरम्यान सोन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा काही पर्याय असे आहेत जे चांगला नफा मिळवून देतात. सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या अशा चार पर्यायांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या या पर्यायांबद्दल

हे वाचा-SBI ग्राहकांनो लक्ष द्या! 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान

1. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond)

सोन्यामध्ये गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे पर्याय आहेत. जसं की दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड बुलियन्स इ. दरम्यान या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड. या सरकारी योजनेत रिस्क अत्यंत कमी असते त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता न करता यातून रिटर्न मिळवू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India RBI) जारी केले जातात. त्यामुळे शुद्धतेची हमी मिळते.

2. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)

सोनं शेअर्सप्रमाणे खरेदी करण्याच्या पद्धतीला गोल्ड ईटीएफ म्हटलं जातं. ही एक म्युच्युअल फंड स्कीम आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी असणाऱ्या स्वस्त पर्यायांपैकी ETF हा एक पर्याय आहे. हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे जो स्टॉक एक्सचेंजवर खरेदी-विक्री करता येतो. गोल्ड ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट गोल्डच्या किंमती असल्याने तुम्ही सोन्याच्या वास्तविक किंमतीच्या आसपास तुम्ही याची खरेदी करू शकता. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे एक ट्रेडिंग डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये सोन्याची खरेदी यूनिटमध्ये केली जाते. याची विक्री केल्यानंतर तुम्हाला सोनं नाही तर त्या किंमतीइतकी रक्कम दिली जाते.

हे वाचा-वाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री!

3. गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Funds)

गोल्ड ईटीएफच्या तुलनेत गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक सोपे आहे. तुम्ही थेट ऑनलाइन किंवा डिस्ट्रिब्युटर्सच्या माध्यमातून गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याकता तुमचे डीमॅट खाते (Demat Account) असावे लागते. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये AMC रिटर्नसाठी गोल्ड ईटीएफमध्ये कॉर्पसची गुंतवणूक करतं. याशिवाय गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना SIP तून गुंतवणूक करण्याचीही संधी देते. गोल्ड म्युच्युअल फंड एक ओपन एंडेड गुंतवणूक प्रोडक्ट आहे, जे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंडमध्ये गुंतवणूक करतं आणि त्याची नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) ETFs च्या प्रदर्शनाशी निगडीत आहे.

4. पेमेंट App च्या माध्यमातून खरेदी करा गोल्ड

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधूनच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. याकरता तुम्हाला अधिक खर्चही करावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार सोनंखरेदी करू शकता. ही सुविधा Amazon Pay, Google Pay, Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या प्लॅटफॉर्मवर उपबल्ध आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold bond, Sovereign gold bond scheme