मराठी बातम्या /बातम्या /मनी /आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या पुढे दर वाढणार की आणखी घटणार?

आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या पुढे दर वाढणार की आणखी घटणार?

डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का? सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का? जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का? सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का? जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का? सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का? जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : जर सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर सध्या चांगली वेळ असून सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 11000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. यूएस फेडच्या व्याज दरात वाढ न करण्याच्या निर्णयामुळे सोने-चांदी दर पुन्हा एकदा घसरला आहे. डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाब वाढला आहे. पण ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे का? सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते का? जाणकारांनी याबाबत माहिती दिली आहे.

सोने-चांदी दरात घसरण का?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोन्या-चांदीच्या घसरणीमागे US Bond Yeild गेल्या 14 महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचणं हे एक कारण आहे. US 10 Year Bond Yeild 1.75 टक्क्यांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तसंच जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर अमेरिका-चीन संबंधांवर संपूर्ण जगाची नजर आहे. त्याशिवाय डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्या-चांदीची चमक कमी झाली आहे आणि रुपयाच्या मजबूतीमुळे भारतीय बाजारात दुप्पट दबाव पाहायला मिळत आहे.

सोनं खरेदीची चांगली संधी?

सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे. आता ज्वेलरीसह गुंतवणूकीतही मागणी वाढेल. येणाऱ्या काळात लग्नसमारंभातही दागिन्यांची मागणी वाढेल. सध्या सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावरुन जवळपास 20 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. इंडिया रेटिंग्सनुसार, रिटेल अर्थात किरकोळ ज्वेलरी मार्केटमध्ये 35 टक्के वाढीची शक्यता आहे.

(वाचा - Gram Ujala Scheme: 3 वर्षांच्या वॉरंटीसह, केवळ 10 रुपयांत मिळेल LED बल्ब)

काय आहे चांदीचा रेट?

चांदीच्या किंमतीवर सध्या दबाव आहे. सध्या रेकॉर्ड स्तरावरुन भाव जवळपास 10,500 रुपयांनी खाली आले आहेत. 7 ऑगस्ट 2020 मध्ये चांदीचा रेकॉर्ड दर 77,949 रुपये इतका होता. चांगल्या मागणीमुळे चांदीला सपोर्ट मिळाला असून मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीमध्ये एका वर्षात 88 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

भारतात येत्या काळात लग्नसमारंभामुळे सोन्या-चांदीची मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसंच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या वर्षात सोने दर 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

First published:
top videos

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money, Multi exchange commodity