Home /News /money /

Gold Price Today : सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today : सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी सोने वायदे भाव (Gold Price Today) घसरला आहे. परंतु चांदीचा भाव वधारला (Silver Price Today) आहे.

    नवी दिल्ली, 25 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी सोने वायदे भाव (Gold Price Today) घसरला आहे. परंतु चांदीचा भाव वधारला (Silver Price Today) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 82 रुपये कमी होऊन 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी MCX वर सोन्याचा भाव 51,109 रुपयांवर ओपन झाला होता. परंतु विक्री वाढल्याने लवकरच 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 51000 रुपयांजवळ आला. याआधी मागील अनेक सत्रात सोन्याचा वायदे भाव वाढला होता, परंतु डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे सोने दर पुन्हा एकदा घसरला आहे. चांदीचा भाव वधारला - सोने दर कमी झाला असताना, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टीकमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी चांदीचा वायदे भाव 10 रुपयांच्या वाढीसह 61,986 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी हा दर 61,996 रुपयांवर ओपन झाला होता. परंतु काही वेळात यात घसरण झाली. या घसरणीनंतरही किंमत 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 62 हजारांच्याजवळ पोहोचला आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या