देशभरात कोरोनाचे संकट असताना (Coronavirus Pandemic) सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. सोन्यामधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांनी अधिक पसंती दिली आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की, सोन्याची खरेदी करण्याशिवाय सोन्याची विक्री करताना देखील कर द्यावा लागतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो. वाचा सविस्तर
बाजारामध्ये सोन्याची किंमत दागिन्याचे वजन आणि कॅरेटप्रमाणे वेगवेगळी असते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. दागिन्यांची रक्कम तुम्ही कोणत्याही पद्धतीने दिली तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो. दरम्यान सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो.