Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, नोकरीवर टांगती तलवार

Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, नोकरीवर टांगती तलवार

सरकारने एअर इंडियाची विक्री करायचं ठरवलं आहे. ही विक्री होण्याआधी कंपनीवरचं 58 हजार कोटींचं कर्ज अर्ध्यावर आणावं लागेल. यासाठीही सरकारची तयारी सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एअर इंडियामधली गुंतवणूक सरकार काढून घेणार आहे. त्यामुळे या निर्गुंतवणुकीनंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. सध्या एक वर्ष तरी त्यांची नोकरी सुरक्षित आहे पण निर्गुंतवणुकीनंतर नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे.

या कर्मचाऱ्यांना VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती देऊन नोकरीतून काढलं जाऊ शकतं. एअर इंडियाच्या नव्या मालकावर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय विम्याचा भार पडू नये म्हणून एक वेगळी ग्रुप इन्शुरन्स स्कीम आणली जाईल. या योजनेचा प्रिमियम सरकार भरू शकतं. पायलट्सना अॅरियर्स देण्यावरही संकट येण्याचा धोका आहे.

सरकारने एअर इंडियाची विक्री करायचं ठरवलं आहे. ही विक्री होण्याआधी कंपनीवरचं 58 हजार कोटींचं कर्ज अर्ध्यावर आणावं लागेल. यासाठीही सरकारची तयारी सुरू आहे. सरकारने गुरुवारी बॉन्ड्सच्या माध्यमातून 7 हजार 985 कोटी रुपये जमवले. या रकमेचा उपयोग कर्जाच्या परतफेडीसाठी होईल.

(हेही वाचा : भारतात जन्मलेल्या या अमेरिकन CEO चा पगार आहे 305 कोटी रुपये!)

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी सरकारने सुरू केल्यानंतर या कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं, तसंच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणंही थांबवलं आहे.एअर इंडियाचे सुमारे १० हजार कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.

======================================================================================

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 03:24 PM IST

ताज्या बातम्या