नवी दिल्ली, 1 जानेवारी : नव्या वर्षात आर्थिक प्रगतीचं ध्येय सगळ्यांसमोर आहे. सरत्या वर्षात घटलेला आर्थिक विकासाचा दर ही चिंतेची बाब होती. कार उद्योगाला याचा सगळ्यात मोठा फटका बसला. देशातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात मारुति सुझुकीने 1 लाख 33 हजार कार विकल्या आहेत. या काळात कंपनीच्या कारची विक्री 3.9 टक्क्यांनी वाढली. निर्यातीमध्येही 10 टक्क्यांपेक्षा वाढ झालीय. मारुती वॅगनार, स्विफ्ट, सेलरियो, इग्निस, डिझायर या गाड्यांची सगळ्यात जास्त विक्री झाली. डिसेंबर महिन्यात चांगला प्रतिसाद मारुती सुझुकी कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मिनी आणि कॉम्पॅक्ट सेल्समध्ये 13.4 टक्क्यांची वाढ झालीय. पॅसेंजर कारची विक्री 9.1 टक्क्यांनी वाढून 91 हजार 342 युनिटवर गेलीय. मारुती सुझुकीच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विक्रीत 1.9 टक्क्यांची घट झाली होती. पण डिसेंबर महिन्यात मात्र चांगला दिलासा मिळाला. मारुतीच्या नव्या योजना मारुती कंपनी यावर्षीच्या विक्रीसाठी नवी योजना आखतेय. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी आणखी नव्या कार बाजारपेठेत आणण्याच्या तयारीत आहे. Maruti Suzuki इग्निस कारचं फेसलिफ्ट मॉडेल आणणार आहे. याचे काही फोटोही सगळ्यांच्या समोर आलेत. यावर्षीच्या मध्यावर ही कार बाजारात येईल. कार उद्योगावर आलेली मंदी यावर्षी दूर होईल, अशी आशा यामुळे सगळ्यांना वाटतेय. (हेही वाचा : रोज 50 रुपये वाचवून मिळवा 10 लाख रुपये, यासाठी आहे हा सोपा उपाय) देशात वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. ऑक्टोबर 2011 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रवासी वाहनांच्या घरच्या बाजारातली विक्री एप्रिलमध्ये 17.07 टक्के घसरून ती 2 लाख 47 हजार 541 झाली होती. ==============================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







