पर्दाफाश: IED स्फोटकांनी भरलेल्या त्या कारचा मालक हिजबुलचा दहशतवादी

पर्दाफाश: IED स्फोटकांनी भरलेल्या त्या कारचा मालक हिजबुलचा दहशतवादी

कारमध्ये स्फोटकं भरून ती कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर धडकवायची असा त्या दहशतवाद्यांचा डाव होता. तो डाव फसला होता आणि मोठा घातपात टळला

  • Share this:

श्रीनगर 29 मे: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला होता. पुलवामासारखाचा मोठा हल्ला करण्याची त्यांची योजना होती. मात्र आधीच माहिती मिळाल्याने हा मोठा कट उधळला गेला. या हल्ल्यासाठी कारमध्ये अतिशय शक्तिशाली असलेल्या IED स्फोटकांचा साठा करण्यात आला होता. ही कार कुणाची होती याचा शोध पोलीस घेत होते. त्याचा पर्दाफाश झाला असून ही कार हिजबुलच्या एका दहशतवाद्याची होती असं पोलीस तपासांत आढळून आलं आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिक हा त्या कारचा मालक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारमध्ये स्फोटकं भरून ती कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर धडकवायची असा त्या दहशतवाद्यांचा डाव होता. तो डाव फसला होता आणि मोठा घातपात टळला होता. आता NIA त्या कटाची पाळमुळए शोधून काढत आहे.

पुन्हा एकदा गाडीमध्ये IED स्फोटकं भरून हिजबुलचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सायकलचा नंबर लावून सेन्ट्रो कार या हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं हा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा मोठा घातपात थोडक्यासाठी टळला आहे.

आमच्यात कुण्या तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही; चीनने अमेरिकेला धुडकावलं

पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल यांनी एकत्र येऊन कारवाई केली. या गाडीमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आलं आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही गाडी चालवत असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांमुळे 33 मजूरांचा जीव धोक्यात, तब्बल 20 तास मृतदेहासोबत केला प्रवास

सुरुवातील गाडीतून जवानांवर तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र काहीवेळानंतर हा दहशतवादी गाडी सोडून फरार झाला. या प्रकरणाची चौकशी NIA करणार आहे. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही गाडी पकडण्यात आली.

First published: May 29, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या