सोन्या-चांदीच्या दरात झाली घट, हे आहेत आजचे दर

सोन्याला मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर खालावले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 30 रुपयांनी कमी झाले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे भाव 90 रुपयांनी घटले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 05:06 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात झाली घट, हे आहेत आजचे दर

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : सोन्याला मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर खालावले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 30 रुपयांनी कमी झाले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे भाव 90 रुपयांनी घटले आहेत.

काय आहे सोन्याचा भाव ?

दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्याची किंमत 39 हजार 210 रुपये झाली. शनिवारी सोन्याचा भाव प्रतितोळा 39 हजार 210 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 503 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर 17. 47 डॉलर प्रतिऔंस आहे.

चांदीची चमक कमी

चांदीचा भाव 90 रुपयांनी खाली येऊन 46 हजार 390 रुपये प्रतिकिलो झाला. शनिवारी चांदीचा दर 46 हजार 480 रुपये प्रतिकिलो वर बंद झाला.

Loading...

(हेही वाचा : 'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!)

सोन्याच्या दरात का झाली घसरण ?

HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, सोन्याची मागणी कमी झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. तरीही रुपयाची घसरण झाल्याने सोन्याच्या दरातली घसरण रोखता आली.अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापारविषयक चर्चेमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

===================================================================================

VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 7, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...