Home /News /money /

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दर वधारला, जाणून घ्या चांदीचा भाव

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दर वधारला, जाणून घ्या चांदीचा भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) वधारला आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे.

    नवी दिल्ली, 31 जानेवारी: आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी सोने दरात तेजी आहे. सोने-चांदी दरात तेजी असतानाही गोल्ड रेट सर्वोच्च दरावरुन स्वस्त मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) वधारला आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे. आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीचा भाव (Silver price) 0.07 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज 48 हजारहून कमी आहे सोन्याचा दर - एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा दर आज 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 47,636 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आज चांदीचा भावही वधारला आहे. आज एक किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 61,079 रुपयांवर पोहोचला आहे. MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅमचा भाव जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरह पोहोचला होता. आज MCX वर सोनं 47,636 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने ट्रेड करत आहे. 2020 च्या तुलनेत आता सोनं सर्वोच्च स्तरावरुन 8564 रुपये स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Petrol Diesel Prices Today: क्रूड ऑइलच्या किमतीत वाढ,पाहा आजचा पेट्रोल-डिझेल रेट

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - E-nomination चे फायदे आणि तोटे काय? घरबसल्या करा EPF नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Multi exchange commodity, Silver prices today

    पुढील बातम्या