मराठी बातम्या /बातम्या /मनी /E-nomination चे फायदे आणि तोटे काय? घरबसल्या करा EPF नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया

E-nomination चे फायदे आणि तोटे काय? घरबसल्या करा EPF नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया

EPFO नुसार, ई-नॉमिनेशनसाठी खातेदार केवळ कुटुंबातील सदस्यालाच नामनिर्देशित करू शकतो. जर त्या व्यक्तीचे कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो दुसर्‍याला नॉमिनी बनवू शकतो. परंतु कुटुंब असल्यास, इतर व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द केले जाईल.

EPFO नुसार, ई-नॉमिनेशनसाठी खातेदार केवळ कुटुंबातील सदस्यालाच नामनिर्देशित करू शकतो. जर त्या व्यक्तीचे कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो दुसर्‍याला नॉमिनी बनवू शकतो. परंतु कुटुंब असल्यास, इतर व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द केले जाईल.

EPFO नुसार, ई-नॉमिनेशनसाठी खातेदार केवळ कुटुंबातील सदस्यालाच नामनिर्देशित करू शकतो. जर त्या व्यक्तीचे कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो दुसर्‍याला नॉमिनी बनवू शकतो. परंतु कुटुंब असल्यास, इतर व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द केले जाईल.

मुंबई, 30 जानेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांसाठी नॉमिनेशन खूप महत्त्वाचे आहे. नॉमिनेशनद्वारे सबस्क्रायबरचे अचानक निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील नॉमिनेटेड सदस्याला ईपीएफओची रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. पूर्वी ही प्रक्रिया थोडी किचकट होती, पण आता ती फक्त ऑनलाइनच करता येणार आहे. आता सदस्य EPFO ​​च्या UAN पोर्टलवर जाऊन नॉमिनी बदलू शकतात. तुम्हालाही नॉमिनी जोडायचे किंवा बदलायचे असतील, तर या स्टेप्स फॉलो करा.

ई-नॉमिनेशनचे नियम

ईपीएफओनुसार, ई-नॉमिनेशनसाठी खातेदार केवळ कुटुंबातील सदस्यालाच नामनिर्देशित करू शकतो. जर त्या व्यक्तीचे कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो दुसर्‍याला नॉमिनी बनवू शकतो. परंतु कुटुंब असल्यास, इतर व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द केले जाईल.

ई-नॉमिनेशनसाठी काय आवश्यक आहे?

>> तुम्ही EPFO ​​च्या 'मेंबर सर्व्हिस पोर्टल' वर लॉग इन करून ई-नॉमिनेशनसाठी नोंदणी करू शकता.

>> ई-नॉमिनेशनसाठी तुमचा UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिव्ह करणे आवश्यक आहे.

>> मेंबर सर्व्हिस पोर्टलवर तुमचा फोटो असणे आवश्यक आहे.

>> UAN ला आधारशी लिंक करणे देखील आवश्यक आहे.

>> आधार लिंक केल्यावरच खाते ओटीपीद्वारे व्हेरिफाय केले जाऊ शकते.

Retirement Planning : निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासणार नाही, असं करा आर्थिक नियोजन

नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया

नॉमिनी बदलण्यासाठी, तुमचा लिंक केलेला मोबाईल नंबर अॅक्टिव्ह असावा कारण तेथे OTP प्राप्त होईल. याशिवाय, तुमचा आधार ईपीएफशी जोडला गेला पाहिजे आणि तुमचा फोटो देखील अपडेट केला गेला पाहिजे.

>> सर्वप्रथम EPFO ​​वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करा.

>> 'सर्व्हिस' टॅबमध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून 'फॉर एम्प्लॉईज' टॅबवर क्लिक करा.

>> आता तुमच्या UAN ने लॉग इन करा.

>> 'मॅनेज' टॅबमध्ये, 'ई-नॉमिनेमशन' निवडा.

>> कायमस्वरूपी आणि वर्तमान पत्ता सेव्ह करा.

>> तुमची फॅमिली डिक्लेरेशन बदलण्यासाठी, 'येस' निवडा.

>> नॉमिनीची माहिती भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.

>> आता पुढे जाण्यासाठी ई-साइन आयकॉनवर क्लिक करा.

>> तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा.

>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आता तुमचे नॉमिनेशन अपडेट केले जाईल.

Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?

नॉमिनी नसल्यास पैसे अडकू शकतात

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, जर खातेदाराने खात्यात नॉमिनी जोडला नाही तर त्याचे ईपीएफओचे पैसे अडकू शकतात. अन्यथा, व्यक्ती त्याच्या खात्यातून ईपीएफ काढू शकणार नाही. तसेच कोणतेही क्लेम सेटलमेंट होणार नाही, क्लेम सेटलमेंटसाठी देखील ई-नॉमिनेशन असणे आवश्यक आहे.

ई-नामांकन दाखल करण्याचे फायदे

सदस्याच्या मृत्यूनंतर पीएफ पैसे, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना (EDLI) सहज मिळू शकतात. हे नॉमिनीला ऑनलाइन दावे दाखल करण्याची परवानगी देते.

First published:

Tags: Money, Pf