मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर पार; पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर पार; पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं?

आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

मुंबई, 6 जून : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी कच्च्या तेलाच्या किंमतीने (Crude Oil Price) प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा पार केला आहे. मात्र सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol DIesel Prices) स्थिर ठेवले आहेत. वाढत्या क्रुडमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 109.27 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

Auto Tips: गाडी चालवताना 'हे' नियम पाळा, पेट्रोल-डिझेलवर होणारा हजारोंचा खर्च वाचवा

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

>> मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

>> दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

>> चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

>> कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Multibagger Share: 11 रुपयांचा शेअर खरेदी करुन कमावले लाखो रुपये; तुमच्याकडे आहे का?

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price hike