Gold Price Today: लॉकडाऊननंतर सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, आज या दराने होतेय सोनेविक्री

Gold Price Today: लॉकडाऊननंतर सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, आज या दराने होतेय सोनेविक्री

Gold, Silver Price Today, 11 June 2021: आज सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) शुक्रवारी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 0.20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून: देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) ओसरू लागली आहे. देशीतील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, काही ठिकाणी कडक निर्बंधांचं पालन करत कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या काळात सोन्याचांदीचे दर वाढू लागले आहेत. आज सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) शुक्रवारी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 0.20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

सोन्याचा लेटेस्ट भाव (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या वायदे किंमतीत 0.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 49,296 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

चांदीचा लेटेस्ट भाव (Silver Price Today)

चांदीच्या दरात एमसीएक्सवर 0.51 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 72,367 रुपये झाली आहे.

हे वाचा-LPG ग्राहकांना दिलासा! सिलेंडर रिफील कुणाकडून करायचा हे तुम्ही ठरवणार

रेकॉर्ड लेव्हलपेक्षा स्वस्त झालं आहे सोनं

तसं पाहिलं तर सोन्याचे दर रेकॉर्ड लेव्हलवरुन 7000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड हायपेक्षा आता जवळपास 7000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

का वाढले सोन्याचे दर?

अमेरिकन ट्रेजरीची घटणारी कमाई, कमजोर अमेरिकन डॉलर आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट यामुळे चिंता वाढली आहे. परिणामी सोन्यामध्ये गुंतवणूक एक सुरक्षित मानली जाते आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे आणि देशांतर्गत भागातही दर वाढत आहेत.

हे वाचा-ग्राहकांना झटका! दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढणं महागणार,RBI वाढवलं हे शुल्क

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 11, 2021, 10:55 AM IST

ताज्या बातम्या