Home /News /money /

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहे सोन्याचा भाव, तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहे सोन्याचा भाव, तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: 24 कॅरेट सोन्याचा 23 मे रोजीचा भाव 51,330 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज सोमवारी चांदीचा दर 61,400 रुपयांवर ट्रेड करत आहे.

    नवी दिल्ली, 23 मे : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोने दरात कोणतेही (Gold Rate Today) बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट सोन्याचा 23 मे रोजीचा भाव 51,330 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा दरही (Silver Rate Today) कायम आहे. आज सोमवारी चांदीचा दर 61,400 रुपयांवर ट्रेड करत आहे. सोन्याच्या 24 कॅरेटच्या 51,330 या किमतीवर कोणताही जीएसटी किंवा इतर चार्जेच जोडले गेलेले नाहीत. गोल्ड फ्यूचर एमसीएक्सवर सोनं 50,992 आणि चांदी 61,640 वर ट्रेड करत आहे. आयएसओकडून (Indian Standard Organization) सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्क दिले जातात. त्यानुसार 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. तर 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं. अधिकतर सोन्याची विक्री 22 कॅरेटमध्ये होते. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.

    हे वाचा - Gold Price: सोने दरात वाढ होणार की भाव घसरणार? हे 5 फॅक्टर्स ठरतील कारणीभूत

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या