नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: नोकरदार वर्गासाठी त्यांच्या EPF अकाउंटमध्ये जमा होणारा पीएफ (PF Balance) अत्यंत आवश्यक असतो. दरम्यान या पीएफच्या रकमेविषयी आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाविषयी काही प्रश्न देखील नोकरदार वर्गाला असतात. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निवृत्तीआधीच जर तुम्ही नोकरी सोडली तर पीएफमध्ये जमा होणाऱ्या रकमेचं काय होतं आणि त्यावर टॅक्स फ्री व्याज मिळते का? दरम्यान निवृत्तीच्या वयानंतरही तुमच्या ईपीएफ खात्यावर व्याज मिळत राहिल. जरी यामध्ये कोणतेही कॉन्ट्रीब्युशन झाले नाही तर व्याज मिळते. तुम्ही वयाची 58 वर्ष पूर्ण करण्याआधी राजीनामा दिला आणि त्यानंतर 36 महिन्यापर्यंत तुम्ही पीएफचे पैसे काढले नाहीत तर तुमचं खातं निष्क्रिय होईल. मात्र तरीही त्यावर व्याज (Interest on EPF) मिळत राहिल. कधी निष्क्रिय होते पीएफ खाते? »वयाच्या 55 वर्षाचे झाल्यानंतर कर्मचारी नोकरीतून निवृत्त झाल्यास »ईपीएफ सदस्य परदेशात गेल्यास हे वाचा- कधी पाहिलं आहे का तरंगणारं ATM? ग्राहकांसाठी SBI ने सुरू केली ही खास सेवा »जर ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाला तर »नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर पीएफचे पैसे काढण्यासाठी पात्र झाल्याच्या तारखेपासून 36 महिन्यांमध्ये कर्मचाऱ्याने सेटलमेंट केली नाही तर काय आहे करासंदर्भातील नियम? आयकराच्या नियमांनुसार, जर 5 वर्षांची सलग सर्व्हिस पूर्ण होण्यााआधी पैसे काढले तर EPF बॅलन्सच्या व्याजावर टॅक्स लागतो. अशावेळी कर्मचाऱ्याने EPF सब्सक्रिप्शनच्या सुरुवातीच्या 5 वर्षात एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये काम केलं तर ते नियमित मानलं जात. जर कर्मचाऱ्याने आधीच्या कंपनीचा ईपीएफ बॅलन्स संध्याच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले. अशा स्थितीत असं मानलं जातं की कर्मचाऱ्याने टॅक्स उद्देशासाठी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सलग सर्व्हिस केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







