सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीची झळाळी उतरली, असे आहेत आजचे दर

सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीची झळाळी उतरली, असे आहेत आजचे दर

देशांतर्गत बाजारात सलग चौथ्या दिवशी सोने खरेदी (Gold-Silver Price Today 28th May 2020) स्वस्त झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे : देशांतर्गत बाजारात सलग चौथ्या दिवशी सोने खरेदी (Gold-Silver Price Today 28th May 2020) स्वस्त झाली आहे. आज सोन्याचे दर 168 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46 हजार 363 झाले आहे. त्यामुळं वायदे बाजारात आजही सोन्याच्या किंमती घसल्याचे दिसून आले. याशिवाय पाच ऑगस्ट 2020च्या सोन्याचा वायदे बाजारातील भाव एमसीएस्कवर गुरुवाती सोन्याचे दर 127 रुपयांची घसरले. यासह प्रति 10 ग्रॅम सोन्याची किमत 46 हजार 580 झाली आहे.

मे मध्ये 47,980 रुपयांचा रेकॉर्ड बनवल्यानंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती घसरून बुधवारी 46799 रुपये प्रति तोळा या किंमतीवर पोहोचल्या आहेत. मंगळवारी 24 कॅरेट म्हणजेच गोल्ड 999 चे भाव शुक्रवारपेक्षा 301 रुपयांनी कमी झाले होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्याच्या सरासरी किंमती अपडेट होत असतात.

याशिवाय वायदे बाजारात सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही घसरण झालेली पाहायला मिळाली. एमसीएक्सवर आज सकाळी तीन जुलै 2020च्या चांदीचे दर 107 रुपयांची घसरून 48 हजार 283 झाले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुवारी सकाळी सोन्याचे वायदा आणि स्पॉट किंमती या दोन्ही बाबींमध्ये वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते गुरुवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा भाव 0.11 टक्के म्हणजेच 1.90 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते. त्याच वेळी सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत प्रति औंस 1728.70 डॉलर होती, ही किंमत 0.40 टक्क्यांनी किंवा 6.89 डॉलरनी वाढली आहे.

वाचा-Google मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार 75 हजारांचा भत्ता

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

वाचा-Lockdown 5.0 ची तयारी की EXIT plan? प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू

भविष्यात काय राहणार सोन्याच्या किंमती?

जगभरात झालेल्या अनेक रिसर्च अहवालांच्या मते सोन्यामध्ये पुढील काही महिन्यामध्ये गुंतवणूक कायम राहील. पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 54000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

वाचा-चौथा लॉकडाऊन संपण्याआधीच Lockdown 5.0 चे संकेत; ही 11 शहरं राहणार बंद?

First published: May 28, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading