नवी दिल्ली, 26 मे : लग्नसराईचा सीजन असतानाही सोन्याचा दर घसरला आहे. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत आज कपात झाली आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 67 रुपयांनी कमी झाला. या घसरणीसह सोन्याचा भाव 50,752 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी सोन्याचा दर 50,840 रुपयांवर ओपन झाला होता, परंतु लगेच 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह भाव 100 रुपयांनी कमी होऊन 50,752 रुपयांवर पोहोचला.
चांदीच्या दरातही घसरण -
चांदीच्या दरातही आज (Silver Price today) घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सकाळी चांदीचा वायदे भाव 247 रुपयांनी कमी झाला. या घसरणीसह 61,287 रुपयांवर चांदीचा दर ट्रेड करत आहे. याआधी चांदीचा भाव 61,526 रुपये प्रति किलोग्रॅमवर ओपन झाला होता. परंतु यात 0.40 टक्कांची घसरण झाली आणि भाव 61,287 वर आला.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर -
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक?
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता -
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.