नवी दिल्ली 12 एप्रिल: सोनं आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) आज घट नोंदवली गेली आहे. MCX वर सोन्याचा वायदा 0.03 टक्क्यांनी घसरुन 46,580 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदीच्या किमती 0.15 टक्क्यांनी घसरुन 66,884 रुपये प्रति किलोग्रॅमवर आल्या आहेत. सोन्याच्या किमती मागील सत्रात 0.5 टक्क्यांनी घसरल्या होत्या. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोनं 56200 या स्थरावर होतं. तर, या महिन्याच्या सुरुवातीला सोनं एक वर्षापूर्वीच्या निच्चांकी स्थरावर पोहोचलं. सोन्याचे दर 44 हजार रुपयांपर्यंत खाली कोसळलं होतं. या हिशोबानं सोन्याच्या किमतीत 12,200 रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उच्चांकी दराच्या तुलनेत सध्या सोनं दहा हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. जागतिक स्तरावरही सोन्याच्या किमतीत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत सोन्याच्या व्यापारात 5.50 डॉलरची घट आली आहे. तर चांदीच्या व्याराताही 0.11 डॉलरची घट झाली आहे. Post Officeच्या या स्किममध्ये दररोज जमा करा 95 रुपये; मॅच्युरिटीवर मिळतील 14 लाख 24 कॅरेट सोन्याच्या किमती - 24 कॅरेट सोन्याचे दिल्लीतील आजचे दर 49820 प्रति दहा ग्रॅम आहेत. तर, चेन्नईमध्ये 47,720, मुंबईमध्ये 45,720 आणि कोलकातामध्ये 48,570 प्रति दहा ग्रॅम आहेत. सोनं खरेदीसाठी सध्या उत्तम वेळ आहे. जेणेकरुन दर वाढताच चांगलं रिटर्न मिळवता येईल. सध्या सोन्याचे दर 46 हजाराच्या आसपासच आहेत. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत दर भरपूर वाढण्याची शक्यता आहे. कारण, मे महिन्यात अक्षय तृतीया आहे. या मुहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करतात. अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक अॅप बनवलं गेलं आहे. ‘BIS Care app’च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून केवळ सोन्याची शुद्धता तपासण्यास मदत होत नाही, तर यासंबंधीची कोणतीही तक्रारदेखील करता येते. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तात्काळ तक्रार करण्याबाबतची माहितीही मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







