मुंबई, 12 डिसेंबर: आजच्या काळात आधार कार्डशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच आधार आवश्यक झालं आहे आणि त्याचबरोबर तो आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवजही बनला आहे. आधार क्रमांक कोणत्याही नागरिकाला त्याच्या आयुष्यात एकदाच दिला जातो. तथापि, ते अपडेट केलं जाऊ शकतं. UIDAI नागरिकांना आधार जारी करण्याचं काम करते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधारमध्ये ‘POI’ आणि ‘POA’ नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे. नुकतेच UIDAI ने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तुम्ही 25 रुपयांमध्ये अपडेट करू शकता- UIDAI ने ट्विट करून माहिती दिली आहे की, ‘विविध सरकारी आणि गैर-सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचे ‘POI’ आणि ‘POA’ दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये अपडेट ठेवा. आधारमध्ये ‘POI’ आणि ‘POA’ दस्तऐवज अपडेट करण्यासाठी 25 रुपये ऑनलाइन शुल्क आकारले जाईल. तर, हे काम ऑफलाइन करून घेतल्यास तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. हेही वाचा: शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं
अशा पुराव्यांची आवश्यकता-
‘POI’ आणि ‘POA’ ला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा देखील मानला जातो. ते अद्ययावत करण्यासाठी, असे डॉक्युमेंट आवश्यक आहेत, ज्यामध्ये नाव आणि फोटो दोन्ही आहेत. पॅन कार्ड, ई-पॅन, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या कागदपत्रांच्या मदतीने ते अपडेट केलं जाऊ शकते. बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क- याशिवाय, तुम्ही 50 रुपये शुल्क भरून तुमच्या आधारमध्ये डेमोग्राफिक डिटेल्स (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल आणि ईमेल) सहजपणे अपडेट करू शकता. बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. तुम्ही नाव पत्ता ऑनलाइन अपडेट देखील करू शकता, परंतु बायोमेट्रिक अपडेटसाठी जवळच्या आधार केंद्रावर जावं लागेल. अलीकडेच UIDAI ने दर 10 वर्षांनी आधार अपडेट करण्यास सांगितलं आहे.
#UpdatedAadhaarPowerfulAadhaar
— Aadhaar (@UIDAI) December 7, 2022
Always keep your ‘POI” and ‘POA’ documents updated in your Aadhaar to avail various government and non government services & benefits.
Charges to update POI/ POA documents in your Aadhaar. Online : Rs 25, Offline : Rs 50.@GoI_MeitY @mygovindia pic.twitter.com/2dkL21OJhf
आधारमध्ये नाव किती वेळा अपडेट करता येईल? आधार कार्डमध्ये 12-अंकी युनिक क्रमांक असतो, जो संबंधित नागरिकाची माहिती उघड करतो. यामध्ये पत्ता, पालकांचे नाव, वय यासह अनेक तपशील आहेत. UIDAIने कोणत्याही आधार कार्डधारकासाठी नाव बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. UIDAI नुसार, आधार कार्डधारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव त्याच्या आयुष्यात फक्त दोनदा बदलू शकतो.