मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं

शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं

शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं

शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं

पंजाब नॅशनल बँकेनं ग्राहकांनी 12 डिसेंबरपूर्वी केवायसी अपडेट करावी लागणार आहे. असं न करणाऱ्या ग्राहकांना खात्यातून व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 डिसेंबर: पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ज्या ग्राहकांनी अद्याप त्यांची केवायसी (Know your Costumer) अपडेट केलेली नाही, त्यांच्याकडे फक्त उद्यापर्यंत वेळ आहे. ज्या ग्राहकांची KYC 12 डिसेंबरपर्यंत अपडेट होणार नाही, त्यांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करण्यात अडचण येऊ शकते. पंजाब नॅशनल बँकेनं स्पष्टपणे सांगितलं आहे की जे ग्राहक KYC अपडेट करणार नाहीत ते त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. PNB नं म्हटलं आहे की रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, ग्राहकांनी त्यांची KYC 12 डिसेंबर 2022 पूर्वी अपडेट केली पाहिजे.

ग्राहकांना वारंवार केलं सूचित-

पंजाब नॅशनल बँकेनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की ज्या ग्राहकांची केवायसी अपडेट करणं प्रलंबित आहे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर दोन नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि या संदर्भातील माहिती नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे. बँकेनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची सूचनाही शेअर केली होती.

हेही वाचा:  Business Idea: ‘या’ प्रॉडक्टला बाजारात प्रचंड मागणी, व्यवसाय सुरु करा अन् खोऱ्यानं पैसे कमवा

खाते प्रतिबंधित केले जाऊ शकते-

पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की- 'रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी केवायसी अपडेट करणे अनिवार्य आहे. तुमचे खातं 30.09.2022 पर्यंत KYC अपडेट केलं नसल्यास, तुम्हाला त्याबद्दल आधीच माहिती दिली गेली आहे. तुम्हाला 12.12.2022 पूर्वी तुमची KYC अपडेट करण्यासाठी मूळ शाखेशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते. अपडेट न केल्यामुळे, तुमच्या खात्याच्या व्यवहारांवर बंदी घातली जाऊ शकते.

केवायसी कशी करता येईल?

केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्त्याचा पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. ई-मेल पाठवूनही ग्राहक हे काम पूर्ण करू शकतात. तसेच, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या वतीने कोणत्याही ग्राहकाला कॉल करत नसल्याचे बँक स्पष्ट शब्दात सांगते. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉल्सबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

केवायसी का आवश्यक आहे?

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा KYC अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतरानंतरही ते अपडेट करण्यास सांगत आहेत.

First published:

Tags: Pnb, Saving bank account