मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या 5 क्रेडिट कार्डवर मिळवा बंपर Cashback! फेस्टिव्ह सीझनमध्येही मिळेल फायदा

या 5 क्रेडिट कार्डवर मिळवा बंपर Cashback! फेस्टिव्ह सीझनमध्येही मिळेल फायदा

क्रेडिट कार्डचा (Credit Card Benefits) वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर कोणती कार्ड्स बेस्ट आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे

क्रेडिट कार्डचा (Credit Card Benefits) वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर कोणती कार्ड्स बेस्ट आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे

क्रेडिट कार्डचा (Credit Card Benefits) वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर कोणती कार्ड्स बेस्ट आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 05 नोव्हेंबर: क्रेडिट कार्डचा (Credit Card Benefits) वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर कोणती कार्ड्स बेस्ट आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बाजारात अशी अनेक क्रेडिट कार्ड उपलब्ध  आहेत जी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खर्च करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करतात. खरेदी आणि ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने क्रेडिट कार्ड डिझाइन केले जातात. तुम्ही तुमच्या जीवनशैलीला अनुसरून क्रेडिट कार्ड घेऊ शकता. आजकाल क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक (Cashback on Credit Card) हे फीचर  लोकप्रिय आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अशा 5 क्रेडिट कार्डबद्दल जाणून घ्या जे सर्वात बेस्ट कॅशबॅक ऑफर देत आहेत.

अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड

अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (Amazon Pay ICICI Bank Credit Card) च्या माध्यमातून Amazon अॅप किंवा वेबसाइटवर खरेदीसाठी प्राइम सदस्यांसाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम सदस्यांसाठी 3 टक्के अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट उपलब्ध आहेत. Amazon वर या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात.

हे वाचा-दिवाळीदिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, मुंबईत तरीही भाव शंभरीपारच!

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड

Flipkart Axis Bank Credit Card द्वारे Flipkart आणि Myntra वर केलेल्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata Sky इत्यादींवर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अमर्यादित कॅशबॅक मिळतो.

अॅक्सिस एस क्रेडिट कार्ड

Axis ACE Credit Card च्या माध्यमातून गुगलवर होणाऱ्या रिचार्ज आणि बिल पेमेंटवर पाच टक्के कॅशबॅक मिळतो. बिग बास्केट आणि ग्रोफर्सवर करण्यात येणाऱ्या खरेदीवर 5% तर स्विगी, झोमॅटो आणि ओलावर 4% आणि इतर सर्व खर्चांवर 2 टक्के कॅशबॅक मिळतो आहे.

एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्ड

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे (HSBC Cashback Credit Card) सर्व ऑनलाइन खर्चांवर (वॉलेट रीलोड वगळता) 1.5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे, तर इतर प्रकारच्या खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला काही सूचीबद्ध असणाऱ्या मर्चेंट्सकडून EMI व्यवहारांवर कॅशबॅक देखील मिळतो.

हे वाचा-Cryptocurrency: या 6 नाण्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल, दिवसाला 2,340.75% चा फायदा

एचडीएफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड

HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्डद्वारे Amazon, Flipkart, BookMyShow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खर्च केल्यास 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय इंधन वगळता सर्व खर्चावर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.

First published:

Tags: Credit card, Credit card statements, Money, Online shopping, Shopping