जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 10 मिनिटांत मिळवा 10 लाखांचं लोन! बँकेतही जाण्याची गरज नाही फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर लिहा 'HI'

10 मिनिटांत मिळवा 10 लाखांचं लोन! बँकेतही जाण्याची गरज नाही फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर लिहा 'HI'

व्हॉट्सअपवर एका झटक्यात मिळेल लोन

व्हॉट्सअपवर एका झटक्यात मिळेल लोन

देशात आता छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर 10 लाखांपर्यंतचे बिझनेस लोन सहज मिळेल. एका प्रायव्हेट फायनेन्स कंपनीने याची सुरुवात केलीये. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा अर्ज.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Loan on Whatsapp : लोन घेण्यासाठी प्रत्येक गरजू व्यक्तींना बँकांचे चक्कर मारावे लागतात. यादरम्यान कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या ओरिजनल कॉपी या सोबत ठेवाव्या लागतात. मात्र, आता डिजिटल युग आले आहे. यामुळेच आता अशा अनेक कामांपासून सुटका होऊ लागली आहे. आता संबंधित बँक किंवा वित्तीय कंपनीच्या मोबाइल अ‍ॅप आणि साइटवर अर्ज करून क्षणार्धात कर्ज घेता येणार आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत खासगी फायनान्स कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवर कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळवता येऊ शकतं.

News18लोकमत
News18लोकमत

एका कंपनीने सांगितले की, ती आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देईल. पण हे बिझनेस लोन असेल आणि तत्काळ मंजूर देखील होईल. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर लोन नेमकं कसं घ्यायचं.

100% डिजिटल प्रोसेसद्वारे मिळवा लोन

IIFL फायनान्सने WhatsApp वर ग्राहकांसाठी झटपट मंजुरीसह ₹10 लाखांपर्यंतच्या बिझनेस लोनची घोषणा केली आहे. WhatsApp वर IIFL फायनान्सचे बिझनेस लोन MSME लोन हा या क्षेत्रातील पहिला-प्रकारचा उपक्रम आहे,. ज्यामध्ये लोनच्या अर्जापासून तर डिसबर्समेंटपर्यंत 100 टक्के सर्वच डिजिटल पद्धतीने होईल.

इंटरनेट नसतानाही कळेल लाइव्ह लोकेशन, हे अ‍ॅप देणार अचूक माहिती, फक्त करा हे काम!

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 10 लाखांच्या कर्जासाठी अर्ज करताना, ग्राहकांना एआय-बॉटला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी, तुम्ही 9019702184 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर “HI” पाठवा. ही पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया असेल. ज्यामध्ये कोणतेही डॉक्यूमेंट द्यावे लागणार नाहीत.

तुमच्या भाडेकरुने बनावट आधारकार्ड तर दिलेलं नाही ना? असं करा व्हेरिफाय

देशातील 450 मिलियनहून अधिक WhatsApp यूझर्स IIFL फायनान्सकडून या 24×7 एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आयआयएफएल फायनान्सचे बिझनेस हेड भरत अग्रवाल म्हणाले, “आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एका सोप्या पेपरलेस प्रक्रियेद्वारे लोन अ‍ॅप्लिकेशन आणि डिस्बर्समेंट पूर्णपणे सोपे केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan , whatsaap
  • First Published :
जाहिरात
जाहिरात