जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्या भाडेकरुने बनावट आधारकार्ड तर दिलेलं नाही ना? असं करा व्हेरिफाय

तुमच्या भाडेकरुने बनावट आधारकार्ड तर दिलेलं नाही ना? असं करा व्हेरिफाय

आधार कार्ड व्हेरिफिकेशन

आधार कार्ड व्हेरिफिकेशन

बनावट आधारकार्ड तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने व्हेरिफाय करु शकता. ही सर्व्हिस मोफत उपलब्ध असते. ते कसं चेक करायचं हेच आज आपण पाहणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 मे: आधार हे आजच्या तारखेला देशातील नागरिकांच्या ओळखीचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. त्याशिवाय कोणताही नागरिक कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सध्या ओळख दाखवण्यासाठी आधार कार्ड चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 12 अंकी आधार देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच जारी केले जाते. परंतु अनेकवेळा आपण आधार बघूनच ते बरोबर असल्याचे गृहीत धरतो आणि त्यावर छापलेले 12 अंक कधीही तपासत नाही. आधार जारी करणाऱ्या अथॉरिटीचं म्हणणे आहे की प्रत्येक 12 अंकी क्रमांक आधार नसतो.

News18लोकमत
News18लोकमत

आधार क्रमांकाची तपासणी आवश्यक

बनावट आधार टाळण्यासाठी 12 अंकी नंबर तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे आधारचे व्हेरिफिकेशन आवश्यक असतं. समजा तुम्ही तुमचे दुकान किंवा घर एखाद्याला भाड्याने दिले आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी तुम्ही त्याच्याकडून आधारकार्ड घेता. ते आधारकार्ड घेऊन तुम्ही भाडेकरूची ओळख योग्य आहे असं मानता. पण ही तुमच्यासाठी मोठी चूक ठरू शकते. कारण लोक बनावट आधार देखील बनवू शकतात. त्यामुळेच आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे.

Credit Card पेमेंटची डेट निघून गेली? डोन्ट वरी, आता भरावा लागणार नाही दंड

फ्रीमध्ये करता येतं व्हेरिफाय

तुम्ही आधार पडताळणी कराल, तेव्हाच समोरच्या व्यक्तीने खरं आधारकार्ड दिलंय की खोटं हे कळेल. कारण बनावट आधार डेटा UIDAI च्या वेबसाइटवर उपलब्ध होणार नाही. आधार पडताळणी सहज ऑनलाइन करता येते. UIDAI व्हेरिफाय करण्याची सर्व्हिस उपलब्ध करते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि प्रोसेसही सोपी आहे. UIDAI ने नुकतेच ट्विट केले होते की, कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी आधार घेण्यापूर्वी ते व्हेरिफाय करा.

इंटरनेट नसतानाही कळेल लाइव्ह लोकेशन, हे अ‍ॅप देणार अचूक माहिती, फक्त करा हे काम!

QR कोडने करता येईल व्हेरिफाय

तुम्ही m-Aadhaar अॅपद्वारे कोणतेही आधार व्हेरिफाय करू शकता. सर्व आधारमध्ये क्विक रिस्पॉन्स (QR) कोड असतो. ते स्कॅन करून तुम्ही आधार व्हेरिफाय करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला पहिले mAadhaar डाउनलोड करावे लागेल. यामध्ये तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनसाठी दोन पर्याय मिळतील. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही आधार क्रमांकासह व्हेरिफिकेशन करण्यास सक्षम असाल, तर दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही आधार कार्डवर दिलेला QR कोड ‘QR कोड स्कॅनर’ ने स्कॅन करून आधार व्हेरिफाय करू शकता. यासोबतच, आधार QR स्कॅनर अॅपद्वारे QR कोड स्कॅन करून देखील आधार व्हेरिफाय केलं जाऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात