जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM Card होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता मिळतोय 5 लाख रुपयांचा फायदा, पण कसा?

ATM Card होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता मिळतोय 5 लाख रुपयांचा फायदा, पण कसा?

एटीएमकार्डवर मिळतो विमा

एटीएमकार्डवर मिळतो विमा

तुम्हाला एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या कॉम्प्लीमेंट्री इंश्‍योरेंसचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला किमान 45 दिवस एटीएम कार्ड वापरावे लागेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: एटीएम कार्ड ही आजच्या काळाची गरज बनली आहे. अनेकदा लोक बँकेत जाऊन पैसे काढण्याऐवजी एटीएम कार्डमधून पैसे काढणे पसंत करतात. याशिवाय तुम्ही याद्वारे ऑनलाइन पेमेंटही करू शकता. एखाद्या व्यक्तीचे एटीएम कार्ड कुठेतरी हरवले तर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. कॅश विड्रॉल आणि ऑनलाइन पेमेंट करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला एटीएममध्ये 5 लाख रुपयांचा विमा देखील मिळतो याची माहिती कदाचित तुम्हाला नसेल. भारतातील बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. प्रत्येक सरकारी आणि खाजगी बँकेच्या एटीएम कार्डसोबत तुम्हाला मोफत विमा संरक्षण देखील मिळते. बहुतेक लोक या इंश्योरेंस कव्हरला क्लेम करत नाहीत, परंतु जर तुम्ही योग्य वेळी दावा केला तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. चला आम्ही तुम्हाला एटीएम कार्डवर मिळणाऱ्या इंश्योरेंस क्लेमविषयी माहिती देत ​​आहोत-

SBI कस्टमर्सला डेबिट कार्डवर मिळतात ‘या’ सेवा, तुम्हाला माहिती आहेत का?

या ग्राहकांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ

तुम्हाला एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या कॉम्प्लीमेंट्री इंश्योरेंस कव्हरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला किमान 45 दिवस एटीएम कार्ड वापरावे लागेल. ग्राहकांना बँकेकडून एटीएम कार्डवर अपघाती विम्याचा लाभ मिळतो. या विम्यासाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. हा प्रीमियम बँक जमा करते. बँका अनेक वेळा याबाबत माहिती देत ​​नसल्याने बहुतांश ग्राहकांना याची माहिती नसते. यासोबतच कार्डच्या कॅटेगिरीनुसार तुम्हाला विमा संरक्षण मिळते.

हे कव्हरेज वेगवेगळ्या कार्डवर उपलब्ध आहे-

-प्रधानमंत्री जन धन खात्यावर रुपे कार्ड उपलब्ध – 1 ते 2 लाख रुपयांचा इंश्योरेंस -जनरल मास्टरकार्ड – 50 हजार रुपयांचे इंश्योरेंस -क्लासिक कार्ड - 1 लाख रुपयांचे इंश्योरेंस -व्हिसा कार्ड - 1.5 ते 2 लाख रुपयांचे इंश्योरेंस -प्लॅटिनम कार्ड - रु. 2 लाख -प्लॅटिनम मास्टरकार्ड - 5 लाख रुपयांचे इंश्योरेंस

मुलींसाठीच्या ‘या’ सरकारी योजनेचा विक्रम, 2 दिवसात उघडले 11 लाख अकाउंट!

अ‍ॅक्सीडेंटल डेथवर मिळतो क्लेम

जर एटीएम कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर कार्डधारकाच्या खात्यातील अ‍ॅड नॉमिनी एटीएम कार्डवर प्राप्त झालेल्या अपघाती मृत्यू विम्यावर दावा करू शकतो. यासाठी तुम्हाला कार्ड होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत बँकेत जाऊन पॉलिसीसाठी क्लेम करावे लागेल. पॉलिसी क्लेम घेण्यासाठी, तुम्ही संबंधित बँकेत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, FIR ची कॉपी, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे दाखवून या विम्याचा दावा करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात