नवी दिल्ली, 14 एप्रिल: जर तुम्ही सणासुदीच्या, लग्नसराईच्या या काळात सोन्याची खरेदी करणार असाल तर त्याआधी सोन्याच्या किंमती (
Gold Price Today) जरुर जाणून घ्या. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (
MCX Multi Commodity Exchange) सोन्याचे दर 545 रुपयांनी वाढले होते, या वाढीनंतर दर 46,964 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचे दर आतापर्यंतच्या रेकॉर्ड हाय स्तरावर होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत सोन्याचे दर 10000 रुपयांनी कमी झाले आहेत. अशावेळी सोनेखरेदी करणं ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.
24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोन्याचा भाव आज दिल्लीमध्ये 49,860 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (
Gold Price Today in Mumbai) 45750 रुपये प्रति तोळा आहे. तर चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 47,690 रुपये आणि 48550 रुपये प्रति तोळा आहे.
(हे वाचा-LIC पॉलिसी काढली असेल तर सावध व्हा! या कारणामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती)
22 कॅरेट सोन्याचा भाव
22 कॅरेट सोन्याचा भाव आज दिल्लीमध्ये 45700 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 44750 रुपये प्रति तोळा आहे. तर चेन्नई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 43740 रुपये आणि 45850 रुपये प्रति तोळा आहे.
दिल्लीतील सराफा बाजारातील मंगळवारचा भाव
दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी 130 रुपये प्रति तोळाची घसरण झाली होती. यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा 46,093 रुपये किंमतीवर पोहोचले होते. दर चांदीच्या दरात (
Silver Price) 305 रुपयांची घसरण होऊन दर 66,040 रुपये प्रति किलोग्राम या स्तरावर पोहोचले होते.
(हे वाचा-रुपयात मोठी घसरण; गेल्या 9 महिन्यांच्या निच्चांक पातळीवर)
का उतरले सोन्याचे दर?
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंज सोन्याची स्पॉट किंमत उतरली आहे. ज्यामुळे भारतीय बाजारातील सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. मात्र मोठ्या फरकाने सोन्याचे दर कमी झाले नाही आहेत. कोरोना संक्रमणात वाढ होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याला पाठिंबा देखील मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.