Home /News /money /

रुपयात मोठी घसरण; पाहा सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम

रुपयात मोठी घसरण; पाहा सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम

Indian Rupees: भारतीय रुपयाच्या किमतीत मंगळवारी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली आहे.

    मुंबई, 14 एप्रिल: अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण (Indian Rupee slips) झाली आहे. यामुळे भारतीय रुपयाने गेल्या 9 महिन्यांतील निच्चांक पातळी गाठत 75.4 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 32 पैशांनी घसरण झाली आणि रुपया गेल्या नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला. बाजारातील तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, भारतीय रुपया लवकरच प्रति डॉलर 76 रुपयांपर्यंत पोहोचेल. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि आरबीआयच्या घोषणेमुळे गेल्या तीन आठवड्यांत खूपच दबाव आला होता. काय होत आहे रुपयात घसरण? 22 मार्च रोजी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 72.38 रुपये इतकी होती. मंगळवारी (दुपारी व्यापाराच्या वेळी) 75.42 च्या पातळीवर घसरला. यामुळे तीन आठवड्यांतील कालावधीत 4.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मंगळवारी एक डॉलरच्या तुलनेत 43 पैशांनी घसरण झाल्याने रुपया नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला. गेल्या सहा दिवसांत रुपयाची किंमत 193 पैशांनी कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या तीन आठवड्यांत रुपयात खूपच मोठी घसरण झाली आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे कोरोना बाधितांची वाढणारी संख्या आहे. यासोबतच देशभरातील आर्थिक कमांवर होणाऱ्या दुष्परिणामांमुळेही चिंता वाढत आहे. वाचा: तुम्ही देखील LIC policy काढली असेल तर सावध व्हा! 'या' कारणामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती रुपयात घसरण झाल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेपासून ते सर्वसामान्य नागरिक या सर्वांवर होतो. सर्वात मोठा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होतो. रुपयात घसरण झाल्याने आयात केलेल्या वस्तूंच्या किमतीत वाढ होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरणीमुळे वस्तूंच्या आयातीवर सर्वात जास्त खर्च येईल. ज्यामुळे परदेशात प्रवास करणे किंवा अभ्यासाचा खर्च आणि बाहेरून मागवण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किमतीवर परिणाम होईल. भारत आपल्या पेट्रोलियम गरजेच्या 80 टक्के वस्तूंची आयात करतो आणि हे सर्व परकीय चलनातच दिले जाते. म्हणूनच हे खरेदी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढतील. दुसरीकडे रुपयाच्या घसरणीचा फायदा निर्यातदारांना होणार आहे. विशेषत: आयटी, रत्ने आणि ज्वेलरी, फार्मा, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी होईल.
    First published:

    Tags: Economy, Rupee

    पुढील बातम्या