Home /News /money /

आता वेळेची होणार मोठी बचत, पुण्याहून या 5 महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा

आता वेळेची होणार मोठी बचत, पुण्याहून या 5 महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा

बजेट एयरलाईन कंपनी स्पाईसजेटने थेट पुण्यातून ही विमान सेवा सुरू केली आहे. कंपनीने शनिवारी जाहीर केलं की, 28 मार्चपासून आपल्या डोमेस्टिक नेटवर्कमधील (domestic network) काही मार्गांवर अतिरिक्त सेवेसह 66 नवीन उड्डाण सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पुढे वाचा ...
  पुणे, 15 मार्च : पुणेकरांसाठी विमान कंपनी स्पाईसजेटकडून (Spicejet) एक चांगली बातमी आहे. आता पुण्याहून थेट 5 शहरांमध्ये उड्डाण करता येणार आहे. या शहरांमध्ये दरभंगा (Darbhanga), दुर्गापूर (Durgapur), ग्लालियर (Gwalior), जबलपूर (Jabalpur) आणि वाराणसी (Varanasi) ही शहरं सामिल आहेत. बजेट एयरलाईन कंपनी स्पाईसजेटने थेट पुण्यातून ही विमान सेवा सुरू केली आहे. कंपनीने शनिवारी जाहीर केलं की, 28 मार्चपासून आपल्या डोमेस्टिक नेटवर्कमधील (domestic network) काही मार्गांवर अतिरिक्त सेवेसह 66 नवीन उड्डाण सेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांना जोडणं हा या नवीन सेवेचा उद्देश आहे. स्पाईसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया यांनी सांगितलं की, उन्हाळ्याच्या सुरुवातीला आम्ही 66 नवीन फ्लाईट सेवा सुरू करणार आहोत. देशातील सर्वात मोठी रिजनल विमान कंपनी म्हणून आम्ही रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. तसंच छोट्या शहरातील प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी दरभंगा, दुर्गापूर, झारसुगुडा, ग्लालियर आणि नाशिकला काही महत्त्वपूर्ण महानगरांशी जोडण्यासाठी नवीन उड्डाणं सुरू होत आहेत. सुरुवातीला या शहरांना स्पाईसजेटने उडान योजनेशी (UDAN scheme) जोडलं असल्याची माहिती कंपनीने दिली.

  (वाचा - Mera Ration App :रेशन कार्ड धारकांच्या अडचणी संपणार, घरसबल्या मिळणार सर्व माहिती)

  स्पाईसजेटने सांगितलं की, ते अहमदाबाद-दरभंगा-अहमदाबाद, हैदराबाद-दरभंगा-हैदराबाद, पुणे-दरभंगा-पुणे आणि कोलकाता-दरभंगा-कोलकाता या मार्गावर नवीन नाईट प्लाईट सुरू करणार आहे. अशाप्रकारे दुर्गापूरला पुण्याशी जोडलं जाईल. स्पाईसजेटने आधीपासूनच दुर्गापूरला चेन्नई, मुंबई आणि दिल्लीशी जोडलं आहे. ग्लालियरला आधीपासून हैदराबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्लीशी कनेक्ट केलं होतं आणि याला पुण्याशीही जोडण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Air india, Money, Spicejet, Travel by flight

  पुढील बातम्या