नवी दिल्ली, 04 जुलै: जपानमधील दिग्गज कंपनी होंडाने (Honda) पुढील महिन्यापासून भारतातमध्ये त्यांच्या गाड्यांचे दर वाढवण्याची तयारी केली आहे. मीडिया अहवालानुसार, इनपुट कॉस्टमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे कंपनी आपल्या देशातील उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा विचार करीत आहे. स्टील आणि मौल्यवान धातूंसारख्या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे हे पाऊल उचलले जात असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. कंपनी भारतीय मार्केटमध्ये सिटी आणि अमेझसह विविध प्रोडक्ट्सची विक्री करते. सध्या कंपनी हे निश्चित करत आहे की या वाढवण्यात येणाऱ्या किंमतीचा किती भार ग्राहकांवर टाकण्यात यावा. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना अशी माहिती दिली आहे की, वाढणाऱ्या खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात येत आहे. हे वाचा- ICICI अलर्ट! सुरक्षित बँकिंगसाठी लक्षात ठेवा या गोष्टी,खातं रिकामं होण्याची भीती होंडा कार्स इंडियाचे सीनिअर व्हाइस प्रेसिंडंट आणि डिरेक्टर (मार्केटिंग अँड सेल्स) राजेश गोयल यांनी पीटीआयशी बोलताना असं म्हटलं आहे की, स्टील, अॅल्युमिनियम आणि मौल्यवान धातूंच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. यापैकी काही वस्तूंच्या किंमती उच्चांक स्तरावर आहेत. याचा परिणाम आमच्या उत्पादन खर्चावर होत आहे. हे वाचा- 6 हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Realme चा सहा कॅमेरावाला स्मार्टफोन; पाहा किंमत कंपनी सध्या दरवाढीच्या तपशिलावर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऑगस्टपासून दरवाढ केली जाईल. गोयल म्हणाले की, आमचे लक्ष्य ग्राहकांसाठी खरेदीची किंमत कमी ठेवणे आहे. आता आम्ही यावर विचार करत आहोत की अतिरिक्त खर्चाचा किती भार स्वत:वर घ्यावा आणि किती ग्राहकांवर टाकावा. सुधारित किंमती पुढील महिन्यापासून लागू होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.