मुंबई, 01 एप्रिल: एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price), एलपीजी गॅस सिलेंडरचे (LPG Gas Cylinder Price Hike on 1st April 2022) दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवत आहेत. आता आणखी एक भार सामान्यांच्या खिशावर पडला आहे. 31 मार्च रात्री 12 वाजल्यापासून अर्थात आजपासून (1 April) राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार आहे. एकेरी टोल टॅक्स 65 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील महामार्गांवरील टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर 1 एप्रिलपासून लागू होत आहेत. अधिसूचनेनुसार ही वाढ 10 ते 65 रुपयांपर्यंत आहे. टक्केवारीमध्ये सांगायचे झाल्यास ही वाढ 10 ते 15 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही जर दररोज राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला ते महागाचं पडणार आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीला जोडणाऱ्या अधिकांश महामार्गावरील टोल टॅक्समध्ये कमीत कमी 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक्सप्रेस वे बाबत बोलायचे झाले तर सराय काले खाँ पासून प्रवास सुरू केल्यानंतर काशी टोल प्लाझापर्यंत कार किंवा जीपसाठी 140 रुपये द्यावे लागायचे आता तुम्हाला 155 रुपये द्यावे लागतील. सराय काले खाँवरुन रसूलपूर सिकरोड प्लाझावर तुम्हाला 100 रुपयांऐवजी 130 रुपये द्यावे लागतील. सर्व प्रकारच्या वाहनांवर याठिकाणी 10-15 टक्क्यांनी टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे.
हे वाचा-LPG Cylinder Price Hike: ग्राहकांना मोठा झटका, 250 रुपयांनी वाढले गॅस सिलेंडरचे दर
कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुल्तानपूर जायचे असेल तर वाहन चालकांना वाढलेल्या दरात टॅक्स द्यावा लागणर आहे. लखनऊ रायबरेली राष्ट्रीय महामार्गावर छोट्या वाहनांना 105 रुपये तर बस-ट्रकना 360 रुपये द्यावे लागतील. याशिवाय लखनऊवरुन अयोध्येला जाणाऱ्यांनाही अधिक पैसे मोजावे लागतील. छोट्या खासगी वाहनांना 110 रुपये तर ट्रक किंवा बससाठी 365 रुपये टोल घेतला जाईल. लखनपासून कानपूर हायवेवर नवाबगंज प्लाझा आहे, त्याठिकाणी छोट्या गाड्यांसाठी 90 रुपये तर कमर्शिअल गाड्यांसाठी 295 रुपये टोल द्यावा लागेल. लखनऊपासून सूल्तानपूर हायवेवर छोट्या वाहनांना 95 रुपये तर मोठ्या वाहनांना 325 रुपये द्यावे लागतील.
या चार व्यक्तीरिक्त आणखी दोन हायवे लखनऊला जोडतात. यापैकी हरदोई राष्ट्रीय महामार्गावर सध्या कोणताही टोलनाका नाही आहे, तर सीतापूरमध्ये ऑक्टोबरमध्ये बदलण्यात आलेला टोल टॅक्स आकारण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Toll, Toll naka, Toll news, Toll plaza